मधुमक्षिका पालनातून करा शेतीतील उत्पादनात वाढ : डॉ. दत्तात्रय गावडे
ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव आणि प्रकल्प संचालक आत्मा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमक्षिका पालन एक पूरक व्यवसाय या विषयीचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आत्मा पुणेचे प्रकल्प संचालक मा. श्री. अनिल देशमुख, प्रसिद्ध मधुमक्षिका पालक श्री. दिनकर पाटील, केव्हीकेचे प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्री. प्रशांत शेटे, शास्त्रज्ञ श्री. योगेश यादव, डॉ. दत्तात्रय गावडे, श्री. भरत टेमकर, श्री. राहुल घाडगे, श्री. धनेश पडवळ, आत्मा पुणेचे गट व्यवस्थापक श्री. गणेश पडवळ, श्री. धोंडीभाऊ पाबळे, श्री. सूर्यकांत विरणक तसेच जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर तालुक्यातील मधुमक्षिका पालक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि विज्ञान केंद्राचे मृदा शास्त्रज्ञ श्री. योगेश यादव यांनी करताना मधुमक्षिका पालन करताना मधुमक्षिकांचा उपयोग फक्त मधासाठी न होता शेतकर्यांसाठी परपरागीकारणासाठी होतो त्यामुळे फळ धारणा होण्यासाठी मदत होऊन पिकाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी मदत होते असे विशद केले. मार्गदर्शन करताना कृषि विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी परिसरामध्ये आढळणार्या मधुमक्षिका, त्यांचे प्रकार, त्यांचे मानवी जीवनातील महत्व तसेच मधुमक्षिकांचा वापर करून शेतकर्यांच्या उत्पादनात कश्याप्रकारे वाढ होईल यासाठी शेतकर्यांनी काय करावे असे सांगितले.
यावेळी शेतकर्यांना मार्गदर्शन करताना लातूर येथील प्रसिद्ध मधुमक्षिका पालक श्री. दिनकर पाटील यांनी 20 पेटयांपासून सुरुवात ते 2,000 पेटी पर्यंतच्या व्यवसाय वृद्धी कश्या प्रकारे झाली या विषयी बोलताना मधुमक्षिका हाताळणी व त्यांचे संगोपन करताना घ्यावयाची काळजी तसेच मध निर्मिती मधील येणार्या अडी-अडचणी विषयी शेतकर्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
अध्यक्षीय भाषणात आत्मा पुणेचे प्रकल्प संचालक मा. श्री.अनिल देशमुख यांनी शेतकर्यांना आपले उत्पन्न वाढविण्यासाठी आत्मा च्या विविध योजना विषयी माहिती सांगितली. शेतकर्यांना अनुदानावर मधुमक्षिका वाटप तसेच जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ व शिरूर येथील शेतकर्यांना मधुमक्षिका प्रशिक्षण देण्यासाठी अभ्यास दौर्याचे नियोजन करण्यात येईल असे आश्वासन दिले.
शेवटी शेतकर्यांना मान्यवरांच्या हस्ते मधुमक्षिका पेटयांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कृषि विज्ञान केंद्राचे मृदा शास्त्रज्ञ श्री. योगेश यादव यांनी केले. व आभार कार्यक्रम सहाय्यक श्री. धनेश पडवळ यांनी मानले.
Share your comments