Milk Rate: गायींच्या दूधदरात प्रतिलिटर चार रुपयांची घसरण झाली आहे. ३७ रुपये प्रतिलिटर असणारा दर ३३ रुपये झाल्याने पशुपालक शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. व्यवसाय सध्या अडचणीत आला आहे.
याबाबत माहिती अशी की, कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, वाघोली, तिसंगी, गर्जेवाडी, कुंडलापूर, जाखापूर, कुची येथे दुग्ध व पशुपालन हा शेतीपूरक व दुय्यम व्यवसाय समजला जातो. घाटमाथ्यावर जनावरांची संख्या सात हजारांपर्यंत आहे. त्यामध्ये जर्सी दुभत्या गायींचे प्रमाण अधिक आहे.
गायीच्या (Cow) दुधाला सध्या फॅटनुसार ३७ रुपयांपर्यंत प्रतिलिटर असा दर होता. दरम्यान, काही दिवसांपासून दरात चार रुपयांची घसरण होऊन दर ३३ रुपये प्रतिलिटरपर्यंत झाला आहे. मात्र म्हशीच्या दूधदरात कोणतीही घसरण झालेली नाही. जनावरांच्या पशुखाद्यात दरवाढ झाली आहे.
पाठोपाठ शेतकऱ्यांकडे उपलब्ध चारा संपुष्टात आल्याने ओला चारा ऊस, कडबा, मुरघास, मका, कडबा यांचे दरही भडकलेत. पाऊस लांबल्याने नैसर्गिक चाराही उपलब्ध नाही. पशुपालक शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्यासाठी जादा भुर्दंड सोसावा लागत आहे.
शिताके मशरूम शुद्ध शाकाहारी पण देणार अस्सल मटणाची चव; जाणून घ्या सविस्तर माहिती...
Share your comments