आपण बघतो की अनेक पुरुषांना आणि आता अलीकडच्या काळात अनेक तरुणांना तंबाखूचे व्यसन आहे. मात्र आता पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे, असे म्हटले तर तुम्हाला खोटे वाटेल मात्र ते खरे आहे. याबाबट धक्कादायक आकडेवारी सध्या समोर आली आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण संस्थेने नुकत्यात केलेल्या एका सर्व्हेतून मद्यपान आणि तंबाखू सेवनाबाबत माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाने ओडिशामध्ये केलेल्या सर्व्हेचा अहवाल नुकताच जारी केला आहे. यामध्ये ही माहिती समोर आली आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे.
यामध्ये गेल्या पाच वर्षांत मद्यपान आणि तंबाखूसेवन करणाऱ्या महिलांची संख्या वाढली असून पुरुषांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे परिस्थिती कशी आहे, हे आपल्या लक्षात येईल. मद्यपान तसेच तंबाखूसेवन हे आरोग्यासाठी घातक आहे. असे असताना देखील याचे सेवन करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक तरुण या व्यसनाच्या आहारी जात आहेत. तसेच अनेकजण फॅशन म्हणून मद्यपान करतात. यामुळे अनेकांचे जीव देखील जात आहेत.
ओडिशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या 15 वर्षांवरील वयोगटातील पुरुष आणि महिला, शहरी भागातील महिला आणि पुरुषांच्या तुलनेत जास्त मद्यपान करत असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये महिलांची संख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व्हेच्या अहवालानुसार, 2015-16 मध्ये 15 वर्षांवरील महिलांमध्ये मद्यपानाचे प्रमाण 2.4 टक्के होते, ते 2020-21 मध्ये वाढून 4.3 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्याचवेळी पुरुषांच्या बाबतीत 2015-16 मध्ये हे प्रमाण 39.3 टक्के होते, ते घटून 28.8 टक्क्यांवर आले आहे. यामुळे याचा अंदाज येईल.
गेल्या पाच वर्षात शहरी महिलांच्या मद्यपानाच्या आकडेवारीत विशेष बदल झालेला नाही. हा आकडा 1.3 टक्क्यांवरून 1.4 टक्क्यांवर पोहोचला आहे, हा अहवालातील महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. यामुळे गेल्या काही वर्षात बदललेले हे चित्र येणाऱ्या काळात अजून बदलेल, असे सांगितले जात आहे. यामुळे आता यावर विचार करणे गरजेचे आहे. नाहीतर येणाऱ्या काळात हा आकडा असाच वाढणार आहे.
Share your comments