अडचणींच्या काळात पैशांची अत्यंत गरज भासते. अशावेळी बँक खात्यात (bank account) पैसे नसतात. मात्र आता बँक खात्यात (bank account) पैसे नसले तरी तुम्हाला पैसे काढता येणार आहेत. प्रोसेस बद्दल जाणून घेऊया सविस्तर..
ओव्हरड्राफ्ट सुविधेचा (Overdraft facility) लाभ घेऊन तुम्ही पैशांची गरज भागवू शकता. आपण ओव्हरड्राफ्ट सुविधेला (Overdraft facility) कमी कालावधीचे कर्ज समजू शकतो. खात्यावर झीरो बॅलन्स (zero balance) असला तरी खातेधारक त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकतो. जवळपास सर्वच शासकीय आणि खासगी बँकांमध्ये ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध असते.
चालू खातं, पगाराचं खातं किंवा मुदत ठेवीवर बँका ओव्हरड्राफ्ट देतात. काही बँकांमध्ये तर शेअर, बाँड, पगार, विमा, घर, संपत्ती आदींवरही ओव्हरड्राफ्ट उपलब्ध करून दिला जातो.
शेतकरी मित्रांनो: मटक्यात मशरूम वाढवून व्हा करोडपती; हा आहे सोप्पा उपाय
ओव्हरड्राफ्टची मर्यादा
आपण गहाण काय ठेवणार आहोत त्यावर ओव्हरड्राफ्टची (Overdraft facility) मर्यादा ठरलेली असते. उदा. मुदत ठेव, शेअर किंवा इतर काही सामान गहाण ठेवल्यानंतर ओव्हरड्राफ्ट मिळू शकते. याच आधारावर व्याजही निश्चित केलं जातं. समजा बँकेत आपल्याकडे 2 लाख रुपयांची एफडी असेल तर जवळपास दीड लाख रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट मिळू शकते.
शेअर, बाँड आणि डिबेंचरमध्ये ही रक्कम कमी किंवा जास्त असू शकते. अर्थात प्रत्येक बँकेचे नियम वेगळे असतात त्यानुसार ही ओव्हरड्राफ्टची रक्कम बदलू शकते. कर्जाप्रमाणे करावा लागेल अर्ज ओव्हरड्राफ्टची सुविधा (Overdraft facility) घेण्यासाठी बँका त्यांच्या ग्राहकांना मेसेज किंवा ई-मेलच्या माध्यमातून माहिती देत असतात. बँकांकडून आधीपासूनच ओव्हरड्राफ्टची मर्यादा निश्चित केली जाते.
आताची सर्वात मोठी बातमी ; आता शेतकऱ्यांना मिळणार डिझेलमागे 60 रुपयांचे अनुदान
गरज असेल तेव्हा ओव्हरड्राफ्टच्या माध्यमातून रक्कम तर निश्चित मिळते. परंतु ओव्हरड्राफ्टही (Overdraft facility) एखाद्या कर्जाप्रमाणेच आहे. कर्ज घेतल्यानंतर त्याची फेड जशी व्याजासहित केली जाते. काही कारणास्तव तुम्ही ओव्हरड्राफ्ट घेतलेली रक्कम फेडू शकला नाहीत, तर गहाण ठेवलेल्या वस्तूंमधून त्याची भरपाई केली जाते.
महत्वाच्या बातम्या
ऐकलंत का ! 'या' शेतकऱ्यांना दिले जाणार 'इतके' अनुदान ; खात्यावर होणार रक्कम जमा
शेतकऱ्यांचे आले सुगीचे दिवस ! गेल्या 6 आठवड्यात गव्हाच्या किंमतीत 14 टक्यांनी वाढ..
होय खरंय ! आता शेतकऱ्यांना स्वस्त मिळणार कृषी यंत्रे; केंद्र सरकारकडून अॅप लाँच
Share your comments