चिखली -तालुक्यातील शेलगाव ज,खंडळा म,अन्वी,मुंगसरी,तेल्हारा,यासह आदि गावातील कांदा नुकसानीची मदत
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व चुकीमुळे रखडुन पडली असल्याचा आरोप स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांची शेतकर्यानसमवेत भेट घेत पुराव्यानिशी केला होता.तर नुकसाग्रस्तांसाठी निधी देण्यात येवुन,ती मदत तातडीने खात्यावर जमा करावी,अशी मागणी त्यांनी केली होती.दरम्याण या शेतकर्याच्या अनुदानासाठी शासनाकडुन चिखली तालुक्यासाठी १४लाख रुपयांची मंजुरात मिळाली असुन तसा आदेश जिल्हाधिकारी एस रामामृती यांनी काढला असल्याने गारपीटीने कांदा नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकर्याना स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे दिलासा मिळाला आहे.
दि.१४एप्रिल २०२१ रोजी चिखली तालुक्यातील शेलगाव जहागीर, खंडाळा मकरध्वज, मुंगसरी आन्वी, तेल्हारा या शिवारांमध्ये मोठ्या प्रमाणात वादळीवार्यासह गारपीट झाली होती.
तेव्हा या भागात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी सरनाईक यांनी केली होती.तेव्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जात पंचनामे सुद्धा केले होते.यांचे अहवाल देखील तयार करण्यात आले होते.दरम्यान जिल्ह्यातील काहि भागात मार्च एप्रिल व मे महिण्या मधे अवेळी पाऊस व गारपीट झाली होती.त्यावेळी शासनाकडुन या नुकसाग्रस्त बाधीत शेतकर्याना जिल्ह्यासाठी ७कोटी ९७लाख ८०हजार रुपये वितरीत करण्यात आले होते.तेव्हा तालुक्यासाठी निधी प्राप्त होऊन देखील गारपीटीने नुकसान झालेले शेतकरी मदतीपासुन वंचीत राहिले होते.याबाबत शेतकर्यासमवेत याबाबत पाठपुरावा केल्यावर तसा अहवालच शासनाकडे पाठवला नसल्याची बाब उघड झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी
शासनाकडुन निधी आला असतांना प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळेच शेतकर्याच्या खात्यावर रक्कम जमा झाली नसल्याचा आरोप लेखी पत्राद्वारे करीत
वेळकाढू धोरण संबंधित विभागाकडून अवलंबले जात असल्याने शासनाकडुन निधी प्राप्त होऊनही शेतकऱ्यांना वेळेत न मिळाल्याप्रकरणी चौकशी करण्यात यावी,चिखली तहसीलला निधी उपलब्ध करुण देण्यात यावा.अशी मागणी शेतकर्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी एस रामामुर्ती यांची भेट घेत पुराव्यानिशी पत्र सादर करीत केली होती.तर तिव्र आंदोलन छेडु असा इशारा शेतकर्यासह सरनाईक यांनी दिला होता.दरम्याण वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधीत विभागात पाठपुरावा केल्यानंतर दि२७डीसेंबर रोजी चिखली तालुक्यासाठी गारपीटीने कांदा नुकसान झालेल्या शेतकर्यासाठी १४लाख रुपये निधी मंजुर केल्याचे आदेश पत्र जिल्हाधिकारी यांनी काढले असल्याने चिखली तालुक्यातील १७४शेतकर्याचे रखडलेले कांदा अनुदान मिळाल्याने
शेतकर्याना दिलासा मिळाला असुन सदरची रक्कम प्राधान्यक्रमे तातडीने वितरीत करण्याचे आदेश तहसिलदार चिखली यांनी नैसर्गीक आपत्ती विभागास दिले असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांच्या प्रयत्नाला मोठे यश मिळाले आहे.
Share your comments