1. बातम्या

फक्त एक लाखाच्या गुंतवणुकीत फुलावा काकडीची शेती, दरमहा होईल 8 लाख रुपयांची कमाई

काकडी फार्मिंग

काकडी फार्मिंग

शेतीचा व्यवसाय करत असाल आणि पारंपारिक शेतीतून अधिक उत्पन्न मिळत नसेल तर तुमच्यासाठी आम्ही एक जबरदस्त आयडिया घेऊन आलो आहोत. जिथे आपण कमी पैसे खर्च करून जास्त पैसा कमावू शकता. यासाठी उत्तम कल्पना म्हणजे काकडी फार्मिंग (Cucumber Farming) आहे. होय, या व्यवसायात आपल्याला कमी वेळेत अधिक पैसे कमाविण्याची संधी मिळेल.

काकडीची लागवड सुरू करून लाखो कमवा

या पिकाचा कालावधी 60 ते 80 दिवसांत पूर्ण होतो. तसे उन्हाळ्याच्या काळात काकडीची लागवड होते. परंतु पावसाळ्यात काकडीचे पीक जास्त घेतले जाते. काकडीची लागवड सर्व प्रकारच्या मातीत करता येते. काकडी लागवडीसाठी जमीन पीएच. 5.5 ते 6.8 चांगली मानली जाते. काकडीची लागवड नद्या आणि तलावाच्या काठावरही करता येते.

काकडीच्या शेतीसाठी सरकार देत अनुदान

काकडीची लागवड करून लाखोंची कमाई करणारा यूपी येथील शेतकरी दुर्गाप्रसाद आहे. ते म्हणतात की, शेतीत नफा मिळविण्यासाठी त्यांनी आपल्या शेतात काकडीच्या बिया पेरल्या आणि अवघ्या 4 महिन्यांत 8 लाख रुपये मिळवले. त्याने आपल्या शेतात नेदरलँडच्या काकडीच्या बिया पेरल्या. या प्रजातीच्या काकड्यांमध्ये जास्त बिया नसतात.

 

ज्यामुळे मोठ्या हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये काकडीची मागणी जास्त आहे. दुर्गाप्रसाद सांगतात की, त्यांनी बागायती विभागाकडून 18 लाख रुपयांचे अनुदान घेऊन शेतीतच सेडनेट घर बांधले होते. सबसिडी घेतल्यानंतरही मला स्वतःहून 6 लाख रुपये खर्च करावे लागले. याशिवाय नेदरलँड्सकडून त्याला 72 हजार रुपयांचे बियाणे मिळाले. बियाणे पेरल्यानंतर 4 महिन्यांनंतर त्याने आठ लाख रुपयांच्या काकडी विकल्या.

 

या व्यवसायाला मागणी का आहे?

या काकडीचे वैशिष्ट्य म्हणजे सामान्य काकडीच्या तुलनेत त्याची किंमत दोन पट आहे. देशी काकडी 20 रुपये प्रतिकिलोला विकली जात असताना नेदरलँडमधील ही काकडी 40 ते 45 रुपये प्रतिकिलो दराने विकली जाते.

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters