1. बातम्या

नाशिक जिल्ह्यातील वाईनरीना मिळणार 40 कोटींचा अनुदान

जिल्ह्यातील वायनरी उद्योगांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य शासनाने राबवलेल्या धोरणानुसार मूल्यवर्धित कराच्या अनुषंगाने शासनाकडे थकीत असलेल्या 40 कोटी रुपयांचा परतावा देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
वायनरीना राज्य सरकार देणार मदत

वायनरीना राज्य सरकार देणार मदत

जिल्ह्यातील वायनरी उद्योगांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य शासनाने राबवलेल्या धोरणानुसार मूल्यवर्धित कराच्या अनुषंगाने शासनाकडे थकीत असलेल्या 40 कोटी रुपयांचा परतावा देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला.

या निर्णयाचा लाभ नाशिक जिल्ह्यातील विविध वायनरी ना होणार असून त्यांनाही शेतकऱ्यांची जात असलेली रक्कम देणेसोपे  होणार आहे.राज्य शासनाने या संदर्भात गेल्या मंगळवारी निर्णय घेतला आहे. तसेच राज्यात उत्पादित झालेल्या वाहिनीच्या भीतीवर देय असलेला 20% मूल्यवर्धित कर भरल्यास त्यापैकी 16 टक्के कराच्या रकमे तितक्याच वाईन प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना 31 ऑगस्ट 2001 आखण्यात आली होती.  या योजनेसाठी 2019ते 20 या वर्षात आणि तत्पूर्वी प्रलंबित असलेले शासनाकडे एकूण 17 दावे आहेत.

 

 

 त्यामुळे शासनाकडे एकूण40 कोटी 85 लाख 73 हजार रुपये इतकी रक्कम देणे आहे. ज्या वायनरी ना या निर्णयाचा लाभ होणार आहे त्या वायनरी कडे शेतकऱ्यांचे अनेक दावे प्रलंबित असल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने 40 कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

या निर्णयाचा फायदा गुड ड्रीप वाईन सेलर्स, एन. डि. वाइन,फ्रेटेली  वाईन्स अनिल चारोसा वायनरी या वाईनरी ना देखील त्यांची देय  रक्कम अदा करण्यात येणार आहे.

 

English Summary: Wineries in Nashik district will get a grant of Rs 40 crore Published on: 26 March 2021, 05:21 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters