1. बातम्या

वाणिज्य मंत्र्यांच्या घरात कांदा फेकणार! कांदाप्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक

सध्या कांद्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता मोदी सरकारने कांद्यावर लावलेल्या ४० टक्के निर्यातकराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा वाणिज्य मंत्र्यांच्या निवासस्थानी कांदा फेकणार, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Onion

Onion

सध्या कांद्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता मोदी सरकारने कांद्यावर लावलेल्या ४० टक्के निर्यातकराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा वाणिज्य मंत्र्यांच्या निवासस्थानी कांदा फेकणार, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा निर्यात कर लादून आणखी एक शेतकरीविरोधी निर्णय घेतला आहे. ज्या वेळी सोयाबीन-कापसाचे भाव पडले त्या वेळी केंद्र सरकारने भाव वाढविण्यासाठी हस्तक्षेप केला नाही.

असे असताना मात्र, आता टोमॅटो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे पडत आहे, असे दिसताच अनेकांच्या पोटात दुखायला लागले. केंद्र सरकारनेही लगेच भाव नियंत्रणात आणण्यासाठी निर्यात शुल्क वाढविण्यास सुरुवात केली.

वस्त्रोद्योग व्यवसायाशी निगडीत अनुदान केंद्र सरकारकडून बंद, व्यवसाय मोठ्या संकटात, राजू शेट्टी यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

विशिष्ट मतदारवर्ग टिकवण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने शेतकऱ्यांना मारण्याचे धोरण राबविले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. केंद्र सरकारने तातडीने ४० टक्के निर्यात शुल्काचा निर्णय मागे घ्यावा, असेही ते म्हणाले.

ब्रेकिंग! कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय, केली मोठी घोषणा, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार.?

दरम्यान, कांदा ही काही जीवनावश्यक वस्तू नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे पडणार असतील तर कोणाच्या पोटात दुखण्याचे कारण काय, असा प्रश्‍न त्यांनी केला.

गुलाबी लसूण आहे फायदेशीर, जाणून घ्या खासियत आणि फायदे, दरही असतो जास्त..
काळी नाही पांढरी वांगी आहेत फायदेशीर, काही महिन्यांत कमवाल लाखो रुपये..
'हमीभाव अनिवार्य कायद्यात दूध, कांदा, बटाटा, टोमॅटो, मोसंबी, संत्रा, सफरचंद, द्राक्ष व डाळिंब यांचाही समावेश करा'

English Summary: Will throw onions in house Minister Commerce! Onion issue farmers' association aggressive Published on: 23 August 2023, 09:35 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters