मराठा आरक्षण मागणीच्या मुद्दावरून मराठा आंदोलक अतिउग्र आंदोलन करत आहेत. मराठा आरक्षणच्या विषयावर तोडगा काढण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर आज सकाळी सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागू नये यासाठी या बैठकीत चर्चा होईल. शरद पवार, अशोक चव्हाण , अंबादास दानवे , उदयनराजे भोसले , संभाजीराजे छत्रपती यांच्यासह सर्वपक्षीय नेते हजर राहणार आहेत. तसेच उध्दव ठाकरेंनाही या सर्वपक्षीय बैठक आमंत्रण देण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात बोललेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे उपस्थित राहणार आहेत. कॅबिनेटमध्ये घेतलेल्या निर्णयानंतर सर्वपक्षीय बैठक घेऊन मराठा आरक्षणाच्या प्रश्नात सोडवण्यासाठी आणि राज्यात शांतता सुव्यवस्था टिकवण्यासाठी सर्वपक्षी बैठक बोलावली आहे.
मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं त्यासोबतच केंद्रातील मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आणि केंद्रीय कॅबिनेटसमोर या संदर्भात चर्चा करावी. राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी आणि त्यानंतर राज्यातील सर्व खासदारांनी राजीनामे द्यावे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडल्यानंतर सर्व पक्षीय बैठकीमध्येसुद्धा ठाकरे गट पक्षाच्या वतीनंही सर्वपक्षीय बैठकीत काय भूमिका समोर ठेवणार हे पाहंणही गरजेच आहे.
तसेच निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने सादर केलेला अहवाल या बैठकित मांडण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाला कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण मिळावं, यासाठी काही कायदेशीर उपाय योजना करणं गरजेचं आहे का? याबाबत चर्चा केली जाणार आहे.
Share your comments