1. बातम्या

राज्य सरकार वाईन विक्रीच्या निर्णयावरुन माघार घेणार? शरद पवारांचे मोठे वक्तव्य..

राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतल्यामुळे सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयाला भाजपने कडाडून विरोध केला जात आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
wine

wine

राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतल्यामुळे सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयाला भाजपने कडाडून विरोध केला जात आहे. तर महाविकास आघाडीने या निर्णयाचे समर्थन करत स्वागत केले आहे. राज्य सरकारला महाराष्ट्राच मद्यराष्ट्र करायचे आहे का? असा संतप्त सवाल भाजपने केला आहे. यामुळे रोज यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यामुळे सध्या चर्चा सुरु आहे. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.

राज्य सरकारने वाईन विक्रीबाबतचा निर्णयावरुन वेगळा दृष्टिकोन स्वीकारला तर वावगं ठरणार नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. राज्य सरकार वाईन विक्रीच्या निर्णयावरुन माघार घेणार का? अशी चर्चा सध्या यामुळे सुरु झाली आहे. यामुळे शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याने संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे आता राज्य सरकार काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे.

शरद पवार म्हणाले की, वाईन तसच इतर लिकरमधील फरक जाणून घेण्याची भूमिका घेतली पाहिजे. ती जर घेतली नाही आणि त्याला विरोध असेल तर सरकारने त्या सगळ्या गोष्टींशी संबंधित वेगळा विचार केला तरी त्याला माझा विरोध असण्याचे कारण नाही. आज चिंताजनक हा विषय असेल असं मला वाटत नाही पण इतर राजकारण्यांना वाटत असेल तर राज्य सरकारने वेगळा दृष्टिकोन स्वीकारला तरी त्याच्यामध्ये फारसं वावग होणार नाही. यामुले सरकारच्या मनात नेमके काय सुरुय आहे, हे सांगणे कठीण जात आहे.

शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार का हे येणाऱ्या काळात समजणार आहे, मात्र याआधी राज्यात विरोधक आक्रमक झाले आहेत. या निर्णयामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाईल, असेही म्हटले जात आहे. मात्र वाईन आणि दारू यामध्ये मोठा फरक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. अनेक देशात वाइन पाणी म्हणून पितात असेही ते म्हणाले. यामुळे देखील मोठा वाद निर्माण झाला होता.

English Summary: Will the state government withdraw its decision to sell wine? Sharad Pawar's big statement .. Published on: 02 February 2022, 03:20 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters