गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऊस उत्पादकांच्या मागे लागलेली संकटे संपताना दिसत नाहीत, अतिरिक्त ऊस, एफआरपी यावरून शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे आता या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. यासाठी आता रयत क्रांती संघटनचे प्रमुख सदाभाऊ खोत आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन केले. तसेच राहिलेल्या उसाला हेक्टरी 50 हजार रुपयांचे अनुदान द्याव अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
शेतकरी अडचणीत असताना सरकार त्यांना मदत करण्याऐवजी त्यांची वीज तोडली जात आहेत. राज्य सरकारने कपट कारस्थान करुन उसाची FRP दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखानदारी मोडीत काढण्याचा डाव या सरकारने घातला आहे. साखर कारखाने खासगी करण्याचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांचे नाव सांगता मग शेतकऱ्यांच्या FRP चे दोन तुकडे का करता? सहकारी साखर कारखाने खासगी का करता? असा सवाल यावेळी खोत यांनी केला.
यावर्षी शेतकऱ्यांवर अनेक संकटे आली, त्यांची वीज देखील तोडली गेली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे विधानभवनाच्या परिसरात सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. विधिमंडळ परिसरात ऊसाची मोळी खांद्यावर घेऊन सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन केले.
राज्य सरकार FRP बाबत अजूनही शेतकऱ्यांना न्याय देत नसेल तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही. यामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. राज्यातील अनेक कारखानदारांनी एफआरपीचे पैसे दिलेले नाहीत, अशा राज्यातील सर्व कारखानदारांवर सरकारने कारवाई करुन शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे द्यावेत अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या;
अतिरिक्त ऊसाचा प्रश्न लागणार मार्गी! 'या' विभागातील मोठ्या 35 साखर कारखान्यांवर टाकली जबादारी
वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुरूच; काही वेळातच झाले होत्याचे नव्हते...
भारत भागवतोय ५८ देशांची भूक, भारतातून ५८ देशांमध्ये गव्हाची निर्यात, युद्धामुळे बाजारभावावर परिणाम, वाचा नवे दर..
Share your comments