1. बातम्या

PM Kisan Nidhi 2024:पीएम किसान योजनेची रक्कम वाढणार का?काय आहे केंद्र सरकराची भुमिका

सरकार विविध योजनांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत असते .त्यातच पीएक किसान सन्मान निधी ही देखील एक योजना आहे. दरवर्षी या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक6000 रुपयांची मदत केली जाते.आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर १५ हप्ते जमा झाले आहेत.तर ही मदत प्रत्येक चार महिन्याला २००० रुपयांच्या प्रमाणे हप्त्याद्वारे दिली जाते.दरम्यान,या योजनेची रक्कम 6000 रुपयांवरुन 8000 रुपये करण्यात यावी अशी मागणी काही शेतकरी करत आहे.याबाबत केंद्र सरकारनं कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
पीएम किसान योजनेची रक्कम वाढणार का?काय आहे केंद्र सरकराची भुमिका

पीएम किसान योजनेची रक्कम वाढणार का?काय आहे केंद्र सरकराची भुमिका

पीएम किसान योजनेची रक्कम वाढवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासुन होत आहे.पीएम किसानची रक्कम दरवर्षी ६००० रुपयांवरून ८०००रुपये किंवा त्याहून अधिक केली पाहिजे,अस शेतकरी म्हणत आहेत. मात्र, ही रक्कम वाढवण्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.कृषिमंत्री अर्जुन मुंडा केंद्र सरकारने संसदेत सांगितले की, पीएम-किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा आर्थिक लाभ ८००० रुपये किंवा १२०००रुपये प्रति वर्ष करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. या योजनेंतर्गत महिला शेतकऱ्यांसाठी रक्कम वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याची माहिती कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी दिली.

सरकार विविध योजनांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत असते .त्यातच पीएक किसान सन्मान निधी ही देखील एक योजना आहे. दरवर्षी या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपयांची मदत केली जाते.आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर १५ हप्ते जमा झाले आहेत.तर ही मदत प्रत्येक चार महिन्याला २००० रुपयांच्या प्रमाणे हप्त्याद्वारे दिली जाते.दरम्यान,या योजनेची रक्कम ६००० रुपयांवरुन ८००० रुपये करण्यात यावी अशी मागणी काही शेतकरी करत आहे.याबाबत केंद्र सरकारनं कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पीएम किसान योजनेची रक्कम वाढणार का?

अनेक लाभार्थ्यांकडून पीएम किसान योजनेची रक्कम वाढवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासुन होत आहे.पीएम किसानची रक्कम दरवर्षी ६००० रुपयांवरून ८००० रुपये किंवा त्याहून अधिक केली पाहिजे,अस शेतकरी म्हणत आहेत. मात्र, ही रक्कम वाढवण्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.कृषिमंत्री अर्जुन मुंडा केंद्र सरकारने संसदेत सांगितले की, पीएम-किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा आर्थिक लाभ ८००० रुपये किंवा १२००० रुपये प्रति वर्ष करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. या योजनेंतर्गत महिला शेतकऱ्यांसाठी रक्कम वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याची माहिती कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी दिली.

पीएम योजनेचा निधी वाढवण्याचा प्रस्ताव नाही -कृषीमंत्री अर्जुन मुंडा

पीएम किसान योजनेची रक्कम वाढवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासुन होत आहे.त्यावर नुकतेच कृषीमंत्र्यांनी भुमिका स्पष्ट केली आहे.सरकार पीएम किसान योजनेची रक्कम ८००० रुपये किंवा १२००० रुपये प्रति वर्ष करण्याचा विचार करत आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना कृषिमंत्री अर्जुन मुंडा म्हणाले की, पीएम-किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा आर्थिक लाभ ८००० रुपये किंवा १२००० रुपये प्रति वर्ष करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. सरकारने आतापर्यंत ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना १५ हप्त्यांमध्ये २.८१लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिली आहे.

PM किसानचा १६ वा हप्ता कधी मिळणार?

PM किसान चे १५ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे.आता शेतकऱ्यांना १६ व्या हप्त्याची प्रतिक्षा लागली आहे.पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात.त्यातील केंद्र सरकार प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये हा निधी वितरीत करते.माहितीनुसार,केंद्र सरकार फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला १६ वा हप्ता जारी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र,याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात १६ वा हप्ता जमा होईल.

English Summary: Will the amount of PM Kisan Yojana increase? What is the role of central government pm kisan nidhi Published on: 08 February 2024, 05:35 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters