Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना 12 तास वीज देऊ. त्यासाठी शेतीचे सर्व फीडर सौरऊर्जेवर आणणार असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. दिवसा 12 तास वीज द्या, अशी शेतकऱ्यांची सातत्याने मागणी आहे. त्यासाठी आपण एक निर्णय घेतलाय.
यासाठी सोलरवर आम्ही भर देत आहोत. याचा पहिला प्रयोग आपण 2017 मध्ये अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी या गावात केला होता असेही फडणवीस म्हणाले. तो सत्यात उतरला आहे. पानी फाऊंडेशनचा फार्मर कप स्पर्धा 2022 चा भव्य पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात पार पडला. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
दिवसा 12 तास वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी योग्य आहे. यासाठी ॲग्रीकल्चर फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील. यावर्षी 30 टक्के फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील. पुढील दोन वर्षात उर्वरित फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील आणि शेतीसाठी दिवसा 12 तास वीज मिळू शकेल.
मानलं भावा! नोकरीपेक्षा शेती भारी; नगरच्या पठ्ठ्याने या पिकातून वर्षात केली 25 लाखांची कमाई!
यासाठी सरकारी पडीक जमिनीचा उपयोग करण्यात येईल. त्यासोबत फिडरजवळ असलेल्या शेतात काही पिकत नसेल तर अशी शेतजमीन सोलरसाठी 30 वर्षे भाड्याने घेण्यास शासन तयार आहे. या जमिनीची मालकी शेतकऱ्याची असेल. 30 वर्षानंतर शेतकऱ्याला जमीन परत दिली जाईल. यातून शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळू शकेल.
बारामतीतील देशी गोवंश सुधारणा प्रकल्पाचे मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन
Share your comments