उद्या १ सप्टेंबरपासून नवीन बदल घडून येणार आहेत. या बदलात अनेक वस्तूंचा दर वाढणार किंवा घटणार आहे. एलपीजी, होम लोन, ईएमआय, एअरलाईन्स आणि इतर बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे. देशातील कोरोना संकटाच्या काळात महागाई वाढताना दिसत आहे. भाजीपाल्यांचे दर वाढत असल्याने महिलांचा बजेट कोलमडत आहे, पण उद्यापासून घरगुती सिलिंडरचा दर कमी होण्याची शक्यता आहे, यामुळे गृहिणींचा बजेटमध्ये बचत होऊ शकते.
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सिलिंडरची किंमत बदलते. अशा परिस्थितीत १ सप्टेंबरला पेट्रोलियम कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सुधारणा करु शकतात, असा विश्वास आहे. एकीकडे गृहणींचा बजेटमध्ये बचत होणार आहे, तर दुसरीकडे उड्डाण प्रवास महागणार आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने १ सप्टेंबरपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवावाशांकडून उच्च विमानन सुरक्षा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एएसएफ फी म्हणून आता स्थानिक प्रवाशांकडून १५० च्या ऐवजी १६० रुपये आकारले जातील, तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून ४.८५ डॉलरऐवजी ५.२ आकारले जातील. इंडिगोने आपली उड्डाण टप्प्या टप्पाने सुरु करणार आहे. १ सप्टेंबरपासून प्रयागराज, कोलकता आणि सुरतीच उड्डाणे देखील सुरू होतील. कंपनी भोपाळ - लखनऊ मार्दावर १८० सीटर एअर बस ३२० चालवेल.
यासह ईएमआयचा बोजा वाढणार आहे. ईएम्आय परत फेड करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला झळ पोहचणार आहे. कारण कोरोनाच्या संकटामुळे यंदा मार्चमध्ये बंदी घातलेल्या कर्ज ग्राहकांच्या ईएमआयची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपत आहे. स्टेट बँक इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक पुढील आठवड्यात याबाबत निर्णय घेईल. दरम्यान ओला आणि उबर कॅब चालक उद्यापासून संप पुकारण्याची शक्यता आहे. दिल्ली - एनसीआरमध्ये कॅब चालक संप पुकारण्याची शक्यता आहे.
Share your comments