परतीच्या पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. असे असताना आता केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे उद्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यामुळे यावेळी ते काय घोषणा करणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या शेतकरी मदतीची मागणी करत आहेत.
त्यांना राज्यातील अतिवृष्टीबाबतची माहिती दिली जाणार असल्याचं राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हंटले आहे. तसेच नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक यावे अशी मागणी करत, नुकसान भरपाईसाठी केंद्राने मदत करण्याबाबत मागणी देखील करणार असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.
नुकसानग्रस्त भागातील अनेक ठिकाणी पंचनामे झाले नसल्याचे आरोप केले जात आहे. मात्र कुणीही पंचनामे करण्यापासून सुटणार नाही. संपूर्ण पंचनामे झाल्यावर आढावा घेऊन, मदत देण्याबाबत अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या समोर मांडण्यात येणार आहे. तसेच पीक विमाबाबत ज्या काही जाचक अटी आहेत त्याही कमी कराव्यात अशा पद्धतीची मागणी सुद्धा केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांच्याकडे करणारआहे.
शेतकऱ्यांनीही भविष्याचे नियोजन करावे! फक्त 200 रुपयांची गुंतवणूक आणि दरमहा 3000 पेन्शन
तसेच अतिवृष्टीमुळे पीकाच्या नुकसानीमुळे आधीच अडचणीत झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामा करण्यासाठीदेखील लाच द्यावी लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला होता. त्यानंतर त्यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले होते.
आंदोलनाला यश! पहिली उचल 3100, कारखान्याचे धुराडे सुरू..
दरम्यान, परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परतीच्या पावसाने हाती आलेली पिके वाया गेली. खरीप हंगामाच्या पिकांना मोठा फटका बसला. आता रब्बीच्या हंगामासाठीची आर्थिक भिंत कशी उभी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 'या' तणनाशकावर बंदी, सरकारने घेतला निर्णय..
LIC देत आहे 20 लाख रुपये, घरबसल्या करा असा अर्ज...
सणसर येथे ऊस परिषदेचे आयोजन, एफआरपीसाठी राजू शेट्टी आक्रमक
Share your comments