निसर्गाने वनक्षेत्र दिले आहे जे की मानवी जीवनासाठी ही एक देण आहे. वनक्षेत्राचे सरंक्षण करणे आपली जबाबदारी आहे. नांदेड जिल्ह्यातील वनक्षेत्र धोक्यात आले आहे. आज जागतिक वनदीन आहे जे की या दिवशी वणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. नांदेड जिल्ह्यात वनामध्ये लागणारी सारखी आग त्यामुळे १ लाख २० हजार हेक्टर वनराई जळून खाक झालेली आहे. वनामध्ये अवैधरित्या वृक्षतोड होत आहे तसेच वनक्षेत्रामध्ये आता शेती व्यवसाय करण्याचे लोकांचे धाडस वाढले आहे. काळाच्या ओघात वनसंवर्धन करणे गरजेचे आहे मात्र नांदेड जिल्ह्यात वेगळेच चित्र समोर आले आहे. मराठवाडा विभागात सर्वाधिक नांदेड जिल्ह्यात वनक्षेत्र आहे.
मराठवाड्यात सर्वाधिक वनक्षेत्र नांदेड जिल्ह्यामध्ये :-
मराठवाडा विभागाच्या ८ जिल्ह्याचे ६४ हजार ८१३ चौ.किमी क्षेत्रफळ आहे म्हणजेच ४.१ टक्के आहे. तर ३.२६ टक्के क्षेत्र वनाच्छादित आहे. जे की यामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे ७.४६ टक्के क्षेत्र, जालना जिल्ह्याचे १.२८ टक्के क्षेत्र, परभणी जिल्ह्याचे १.५३ टक्के क्षेत्र, हिंगोली जिल्ह्याचे ५.९८ टक्के क्षेत्र तर नांदेड जिल्ह्याचे ९.४७ टक्के क्षेत्र आहे. असे असताना देखील मराठवाडा विभागातील नागरिकांचे वनक्षेत्र संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे.
वनक्षेत्रात या झाडांचा आहे समावेश :-
नांदेड जिल्ह्यातील जे पसरलेले वनक्षेत्र आहे त्या वनक्षेत्रात पिंपळ, गुलमोहर, बांबुसा, उंबर, सीताफळ, जांभूळ, सप्तपणर्णी, आवळा, चिंच, मोहबेल, कडूनिंब, आंबा, चारोळी, अशोक, पळस या वृक्षांचा समावेश आहे. परंतु किनवट, माहूर आणि उमरी भोकर या भागामध्ये वनक्षेत्राचे अधिकचे क्षेत्र आहे . जे की याच भागामध्ये अधिकची वृक्षतोड होत असल्याने जंगल हे नष्ट होत चालले आहे.
वन्यप्रेमींनी केली चिंता व्यक्त :-
मराठवड्यात सर्वात जास्त वनक्षेत्र हे नांदेड जिल्ह्यत आहे जे की नांदेड जिल्ह्यातील वनसंपदा धोक्यात आलेली आहे. आज २१ मार्च जागतिक वनदीन निमित्ताने नांदेड भागातील वन्यप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. आतापर्यंत लागणाऱ्या सारख्या आगीमुळे नांदेड मधील एक लाख वीस हजार हेक्टर वनराई नष्ट झालेली आहे. जे की नांदेड जिल्ह्यातील माहूर आणि किनवट तालुक्यात सर्वात जास्त वनक्षेत्र आहे मात्र वृक्षतोडमुळे हे क्षेत्र कमी होत चालले आहे.
Share your comments