MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

पुष्पा सिनेमातील रक्तचंदनाला इतकी मागणी का? जाणून घेऊ चंदनाचा वापर आणि मह्त्व

दक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार अल्लू अर्जुन चा पुष्पा या सिनेमाने देशभर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटातील संगीत गाणी, प्रत्येकांच्या मनात बसली आहेत. देशात कोरोनाचे संकट असतानाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. खरं तर भारतीय सिनेमांचा गुन्हेगारी हा सगळ्यात आवडता विषय. कधी सोने तर कधी ड्रग्जची तस्करीतून जन्म घेणारी गुन्हेगारी अशा विषयावर या आधी खूप सारे सिनेमे आले त्यांनाही प्रेक्षकांना चांगला प्रतिसाद दिला. पण पुष्पा सिनेमाची कथा काहीशी वेगळी आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
sandalwood

sandalwood

दक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार अल्लू अर्जुन चा पुष्पा या सिनेमाने देशभर  धुमाकूळ घातला आहे. चित्रपटातील संगीत गाणी, प्रत्येकांच्या मनात बसली आहेत. देशात कोरोनाचे संकट असतानाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. खरं तर  भारतीय सिनेमांचा गुन्हेगारी हा सगळ्यात आवडता विषय. कधी सोने तर कधी ड्रग्जची तस्करीतून जन्म घेणारी गुन्हेगारी अशा विषयावर या आधी खूप सारे सिनेमे आले त्यांनाही प्रेक्षकांना चांगला प्रतिसाद दिला. पण पुष्पा सिनेमाची कथा काहीशी वेगळी आहे.

पुष्पा सिनेमाची कथा रक्तचंदन अर्थात लालचंदनाच्या तस्करीवर आधारित आहे. आतापर्यंत हा विषय समोर आला नव्हता. त्यामुळे  ही कथा चित्रपट रसिकांना चांगली आवडली आहे. वास्तविक हा विषय खरा आहे. दक्षिणेतील राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तचंदनाची तस्करी  होत असते. त्यातून अनेक गुन्हेगारांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. तर आपल्या सर्वांना एक प्रश्न पडतो तो म्हणजे रक्तचंदनाला इतकी मागणी का असते. या लाकडाचा काय उपयोग होतो. या विषयी आपण या लेखात माहिती घेणार आहोत..

काय आहे रक्तचंनाचे महत्त्व

पैसे झाडावर उगतात का असे म्हटलं जातं, हे  रक्त चंदनाचे झाडसाठीचं.  लालचंदन हे पैशाचे झाड असल्यााचे म्हटले जाते. सोन्यापेक्षा चंदनाला जास्त किंमत आहे. रक्तचंदनाला  परीस म्हटले जाते.  ज्याच्या हाती लागले त्याचे दिवस पलटले असेच समजा. रक्तचंदन तीन रंहामध्ये पाहायला मिळते. पांढरे, पिवळेव लाल. मात्र लाल चंदनाला इतर दोघांच्या तुलनेत मोठी मागणी असते. त्यामुळे साहकि ते महाग असते. पिवळ्या चंदनाचा वापर वैष्णव करतात तर लाल चंदन शैवपंथी वापरतात.

चंदनाला  वैज्ञानिक भाषेत पेरोकार्प सँटालिनस म्हटले जाते.  तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या दोन राज्याच्या सीमेवर फक्त चार जिल्ह्यांमधील जवळपास पाच लाख हेक्टरवर पसरलेल्या जंगलात हे रक्तचंदन सापडते. वेल्लोर, चित्तुर, कडप्पा आणि कुरनुल येथील शेषाचलम डोंगरावर मोठ्या प्रमाणात आहे.ठराविक भागातच ते मिळत असल्याने त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.  रक्तचंदनाचे झाड  ते 11 मीटरपर्यंत उंच वाढते. हे झाड हळूहळू वाढत असल्याने त्याची घनता खूप जास्त असे, त्यामुळेच  इतर लाकडाच्या  तुलनेत ते लवकर पाण्यात तरंगते. 

रक्तचंदनाचा वापर

हिंदू धर्मात रक्त चंदनाला खूप महत्व आहे. अगरबत्तीपसून ते टिळा लावण्यापर्यंत या लाकडाचा उपयोग होतो. त्यापासून महाग फर्निचरचही बनवले जाते. दारू बनवण्यासाठीही  त्याचा वापर केला जातो.  रक्तचंदनामुळे सौंदर्य़ बहरते, असेही म्हटले जाते. चीन, सिंगापूर, जपानमधूनही मोठ्या प्रमाणात त्याला मागणी आहे. रक्तचंदनाच्या व्यापारासाठी  लागणाऱ्या बोलीत युएई,चीन, जपान, तसेच अनेक पाश्चात्य देशातील शेकडो व्यापारी सहभागी होतात.

 

सहजासहजी ते मिळत नसल्याने त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. त्यामुळे या भागात एसटीएफची स्पेशल तुकडी तैनात करण्यात आली आहे. रक्तचंदनाच्या तस्करीतून तुफान पैसा मिळत असल्याने अनेक सराईक गुन्हेगार तस्करीतस्करीत  सहभागी आहेत. सक्तचंदनाची तस्करी  करताना सापडल्यास  11 वर्ष कारावास होऊ शकतो.

English Summary: Why is there so much demand for blood sandalwood in Pushpa cinema? Learn the use and importance of sandalwood Published on: 27 January 2022, 08:15 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters