1. बातम्या

नोकरी कशाला करायची , घरीच सुरू करा बिझनेस होईल बक्कळ कमाई

तुम्ही सुशिक्षित आहात आणि नोकरी करायची नाही तर अशी अनेक बिझनेस आहेत. जे तुम्ही घरात राहून करू शकतात. त्यातून तुम्ही कमाई देखील करू शकणार आहात. कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर लोक बेरोजगार झाले आहेत. आधीच देशात बेरोजगारी कमी नव्हती. प्रत्येक क्षेत्रात नोकरीची संधी कमी झाली आहे

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

तुम्ही सुशिक्षित आहात आणि नोकरी करायची नाही तर अशी अनेक बिझनेस आहेत. जे तुम्ही घरात राहून करू शकतात. त्यातून तुम्ही कमाई देखील करू शकणार आहात. कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर लोक बेरोजगार झाले आहेत. आधीच देशात बेरोजगारी कमी नव्हती. प्रत्येक क्षेत्रात नोकरीची संधी कमी झाली आहे. पुढील काही दिवसात आता ज्यांच्या नोकऱ्या टिकल्यात त्यांच्या नोकऱ्यांवरी संकट येण्याची शक्यता आहे

जर तुम्ही शिकलेले असाल आणि जर तुम्हाला तुमच्या पायावर उभे रहायचे असेल तर असे काही छोटे- छोटे व्यवसाय आहेत. जे तुम्ही घरातून सुरू करू शकता आणि चांगली कमाई करू शकता. आज आम्ही तुम्हाला ५ लाख व्यवसायांची माहिती देणार आहोत. या बिझनेसमध्ये खूप पैसा गुंतविण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मेहनतीने नंतर हे व्यवसाय वाढवू शकता. तसेच दुसऱ्यांनाही रोजगार देऊ शकता. एवढेच नाही तर तुम्ही या व्यवसायाची सुरुवात ही तुमच्या घरातून करू शकता.

कोचिंग क्लास

जर तुम्ही शिकलेले असाल आणि गणित, इंग्रजी, सायन्स यासारख्या विषयात पारंगत असाल तर ऑनलाईन किंवा ऑफलाईनद्वारे मुलांना,कॉलेजच्या विद्यार्थ्याचे क्लास सुरू करू शकता. सध्या कोरोनामुळे ऑनलाईन कोचिंगला प्राधान्य जास्त दिलं जात आहे.

ब्लॉगिंग

एखाद्या खास विषयावर जर तुम्ही मजबूत पकड असेल तर तुम्ही डिजिटल तुमचे ज्ञान इतरांना देऊ शकता. जर तुम्ही कंटेंट लिहत असाल तर त्याद्वारे तुम्ही पैसे कमवू शकता. अनेक कंपन्यांमध्ये पार्ट टाईम काम दिले जाते. छोटे- छोटे व्हिडिओ युट्युबवर टाकू शकता ब्लॉग लिहू शकता. काही ब्लॉग प्लॅटफार्म रीडरच्या हिशोबाने पैसे देतात. अनेकदा गुगल एडसेंस च्या माध्यमातून जाहिराती मिळतात.

 

ऑनलाईन व्यवसाय

तुम्ही तुमचा ऑनलाईन व्यवसााय सुरू करू शकता. फ्लिपकार्ट-अमेझॉन साईटवर तुम्ही तुमची उत्पादने विकू शकता. त्यापूर्वी तुम्हाला कोणत्या उत्पादनाची किती डिमांड आहे याची माहिती मिळवावी लागेल. तुम्ही थेट त्याच्या उत्पादकाची संपर्क करू शकता. खर्च आणि विक्री किंमतीच्या तुलनेनंतर तुम्हाला फायद्याचा अंदाज येईल. तुम्ही उत्पादक किंवा होलसेरला यासाठी मनवू शकता. जेवढ्या ऑर्डर येतील त्याद्वारे तुम्हाला उत्पादनांची गरज भासेल. हा व्यवसाय तुम्ही हळू-हळू वाढवू शकता. मोठ्या शहरांमध्ये तुम्ही हा व्यवसाय आरामात कर शकता

प्लेसमेंट सर्व्हिस

आज सर्वच कंपन्या या कर्मचारी प्लेसमेंट सर्व्हिसमधून त्यांना नोकरीसाठी बोलवत असतात. सुरक्षा गार्ड सफाई कर्मचारी, हेल्पर, आदी टेक्निकल लोक हे अशाच प्रकारे भरले जातात. तुम्ही तुमच्या घरात प्लेसमेंट एजन्सी सुरू करू शकता. त्यानंतर तुम्ही मोठं - मोठ्या कंपन्यांशी टायअप करू शकता. जास्त खर्च नसलेला हा छोटा व्यवसाय आहे. ट्रान्सलेटर जर तुम्ही हिंदी, इंग्रजी, किंवा अन्य कोणत्याही भाषेत अनुवाद करू शकत असाल तर तुम्ही घरबसल्या चांगली कमाई करू शकता.

English Summary: Why do a job, start a business at home will be a huge income Published on: 18 September 2021, 09:19 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters