सध्या टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतींमुळे एक बायको नव-याला सोडून घरातून निघून गेली. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील शाहदोल जिल्ह्यात घडली आहे. यामुळे या घटनेची चांगलीच चर्चा सुरू आहे.
संजीव बर्मन याचा टिफिन सर्व्हीसचा व्यवसाय आहे. त्याने घरी जेवण बनवत असताना २ टोमॅटो वापरले होते. यावरून त्याचे आणि त्याच्या बायकोचे जोरदार भांडण झाले होते. हा वाद वाढतच गेला.
भांडण सुरू असताना संजीवची बायको उठली आणि तिने त्यांच्या मुलीसह घरातून बाहेर पाऊल ठेवले आणि ती परत आलीच नाही. यामुळे आता टोमॅटोमुळे काय काय होऊ शकत याचा अंदाज आला असेल.
शेतकरी नेत्यांना मोठा धक्का! राजू शेट्टी, खोत, पाटील यांना ऊस दर नियंत्रण मंडळातून वगळले...
न विचारता जेवणात २ टोमॅटो वापरल्याने संजीवची बायको त्याच्यावर भडकली होती. संजीवने या दोघींना शोधायचा बराच प्रयत्न केला मात्र दोघी कुठेही सापडल्या नाहीत. यामुळे त्याने पोलिसांत धाव घेतली आणि बायकोने मुलीसह घर सोडले असून दोघी सापडत नसल्याची तक्रार दिली.
दरम्यान बाजारात आता टोमॅटो 200 रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. यामुळे तो खाणे परवडत नाही. यामुळे त्याचे दर कधी कमी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टोमॅटो उत्पादक शेतकरी मात्र सध्या चांगले दिवस आहे आहेत.
सदाभाऊ टोमॅटोच्या दरावरुन आक्रोश करणाऱ्या शहरी नागरिकांवर भडकले, म्हणाले थोड्या दिवसांनी सरण रचायलाही टोमॅटो देऊ...
डाळींबाची कोण जात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त, जाणून घ्या..
कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता, दुष्काळी भागाला पाणी मिळणार
Share your comments