1. बातम्या

का महत्त्वाची असते पीक पाहणी; जाणून घ्या! कशापद्धतीने होते पाहणी

KJ Staff
KJ Staff


शेतकरी शेती करत असताना शेती संबंधित असलेल्या कायदेशीर गोष्टी,  शेतीबाबत च्या विविध गोष्टींच्या व्याख्या किंवा त्यांच्या असलेले महत्त्व याबाबतीत शेतकर्‍याला काहीच माहिती नसते.  काही गोष्टी माहिती असतात परंतु त्याचे जुजबी ज्ञान शेतकऱ्याकडे नसते.  शेतीच्या संबंधित सातबारा व त्यावर लावलेली पिक पाहणी फार महत्वाचे असते.  पीक पाहणी संदर्भातले तलाठी व त्याची काय कर्तव्य असतात किंवा काय जबाबदारी असते हे या लेखातून समजून घेऊया.

  कशी होते पीक पाहणी

 •  साधारणपणे पिक पाहणी ची कामे वर्षातून दोनदा करायचे असतात.
 •  पहिले म्हणजे खरीप हंगामात साधारणतः 1 ऑगस्ट ते 15 ऑक्‍टोबर दरम्यान
 • दुसरे म्हणजे रब्बी हंगामात साधारणतः 15 नोव्हेंबर ते 31 जानेवारी या कालखंडात
 •  परंतु सध्या साधारणता काही बियाणे हे लवकर कापणी वर येतात.  त्यामुळे खरीप हंगामात पिक पाहणी हंगामातील सप्टेंबरपर्यंत तर रब्बी पाणी 31 डिसेंबरपर्यंत संपेपर्यंत अपेक्षित असते.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या नियम 1971 मधील नियम 30(1) नुसार, तिच्या शेतात उभे असतील त्याच काळात तलाठी यांनी स्वतः शेतावर जाऊनच पाणी करणे आवश्यक असते. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या नियम 30(2) नुसार तलाठी यांनी पिक पाहणीसाठी जाण्यापूर्वी संबंधित शेतमालक,  सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी यांना पीक पाहणीच्या वेळेस हजर राहण्याची सूचना अथवा नोटीस लेखी स्वरूपात सात दिवस आधी दिनांक व वेळ दवंडीने अथवा समुचित पद्धतीने कळविली पाहिजे.

 दुसरे महत्त्वाचे म्हणजे शेतावर जे पीक उगवले आहे आणि उगवलेले पीक जितक्या क्षेत्रावर आहे. याची अचूक नोंद घेणे तलाठीचे काम असते.     महत्त्वाचे म्हणजे पीक पाहणी करताना शेतातील उभ्या पिकांसह त्या जमीनीतील कूळ हक्क, वहिवाटदार,  मिश्र पिके,  झाडे,  फळझाडे,  दुबार पीके, जलसिंचनाची साधने जसे की विहीर, बोरवेल इत्यादींची अचूकपणे तपासणी करावी व दप्तरातील नोंदी अद्ययावत कराव्यात.

 

 
बहुतांशी पीक पाहणी करताना असे दिसते की,  अनेक शेतकरी त्यांचे क्षेत्र वही वाटताना, पिके घेताना,  रस्ता तयार करताना हद्दीच्या निशाणीचे नुकसान करतात. हद्दीच्या निशान असलेले दगड,  खुणा,  निशाण्या जाणून-बुजून कशा करतात जर कोणत्याही शेतकऱ्याने त्याचे क्षेत्र वही वाटताना,  पिके घेताना हद्दीच्या निशाणीचे नुकसान केल्याचे,  निशाणीचे दगड,  खुणा इत्यादी निशाण्या जाणून-बुजून नाहीश्या केल्याचे किंवा बुजवून टाकल्याचे आढळल्यास त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 140/ 145 अन्वये कारवाई करण्यात येऊ शकते.

  महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया नियम 1971 मधील नियम 30(4) नुसार तलाठी यांना पीक पाहणी केल्यानंतर शक्य तितक्या लवकर मंडलाधिकारी किंवा त्याच्या दर्जापेक्षा कमी नाही असा अधिकारी त्या गावाला पूर्वसूचना देऊन भेट देईल आणि तलाठी यांनी केलेल्या पीक पाहणीची पडताळणी करेल.  पीक पाहणीतील ज्या नोंदी चुकीच्या आढळतील त्यात तलाठी यांच्याकडून दुरुस्ती करून घेतली जाते.  तलाठी व मंडळ अधिकारी यांनी केलेल्या प्रत्यक्ष पीक पाहणी संपविल्‍यानंतर गाव नमुना नंबर 11 मध्ये सर्व पिकांची नोंद करून ते अद्ययावत करावी लागते आणि अध्यावत गाव नमुना नंबर 11 31 मे पूर्वी तहसीलदारांकडे सादर करावा लागतो.

 

 
पीक पाणी करताना होणाऱ्या चुका

 • शेतामध्ये पिके उभी असताना त्याकाळात पीक पाहणी न करता तोंडी माहितीनुसार बऱ्याचदा नोंदी घेतल्या जातात.
 • तलाठी बऱ्याचदा प्रत्यक्ष शेतावर जाऊन पीक पाहणी करत नाहीत.
 • बऱ्याच वेळा पीक पाहणी ठरलेल्या काळात सुरू होत नाही व ठरवून दिलेल्या काळात संपवली ही जात नाही.
 • गावात दवंडी देणे दवंडी रजिस्टरला नोंद घेणे, गावकऱ्यांना यासंबंधीची सूचना देणे वगैरे गोष्टी केल्या जात नाहीत.
 • प्रथमतः गाव नमुना 11 भरणे आवश्यक असतो परंतु तसे न करता का नमूना क्रमांक 12 लिहिला जातो.
 • बऱ्याचदा तलाठी यांनी केलेली पाहणी मंडलाधिकारी तपासत नाहीत.
 • शेतात उभ्या पिकासह, जमीनीतील कूळ हक्क, वहिवाटदार, सीमा चिन्हे, जलसिंचनाचे साधने तपासता दप्तरातील नोंदी अद्ययावत केल्या जात नाही.
 • मागील वर्षीच्या मतदाराचे नाव खात्री न करता चालू वर्षी लिहिले जाते. वहिवाटदार जिवंत आहे किंवा नाही याची खात्री केली जात नाही. त्यामुळे अनेक वर्षांपर्यंत मयताचे नाव वहिवाटदार सदरील लिहिले जाते.
 • नमुना नंबर 14 चा फॉर्म तहसीलदाराकडे लवकर पाठवला जात नाही.
 • बऱ्याचदा असे होते की, कुळत असल्यास त्यांच्या वारसांची नोंद गाव दप्तरी न करताच कुळाच्या वारसांची नावे वहिवाटदार सदरे लिहिली जातात.

   वरीलपैकी चुका तलाठी यांनी टाळाव्यात व शासनाला शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा योग्य अभ्यास आणि विश्लेषण करण्यास साहाय्य व्हावे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters