
sanjay raut
महाराष्ट्रामध्ये सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाला विरोधकांनी प्रचंड प्रमाणात विरोध केला आहे.
यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोध करणारे हे शेतकऱ्यांचे शत्रू असल्याचा आरोप केला आहे. जर वाईन विक्रीच्या माध्यमातून वाईनची विक्री वाढवून निर्यात वाढली तर शेतकऱ्यांना त्यांचा लाभ होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव चांगला मिळेल शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढण्यास मदत होईल.
मंत्रिमंडळाने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताशीसंबंधित असून जेराजकीय पक्ष याचा विरोध करत आहेत त्यांनी याचा विचार करावा सोबतच त्यांनी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित समजून घ्यावे, असे संजय राऊत म्हणाले.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्राला एक परंपरा असून महाराष्ट्राने काय बनावे,यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत महा विकास आघाडीचे सर्व नेते समर्थ आहे. त्यांना सरकार चालवण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे उगाचच विरोधकांनी लेबल लावू नये असे राऊत म्हणाले. विरोधकांवर टीका करताना संजय राऊत म्हणाले की तुम्ही असे लेबल लावू नका.
शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय धाडसाने घ्यावे लागतात. तुमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्र खऱ्या अर्थाने मद्यराष्ट्र होईल, असे निर्णय घेतले जाणार होते पण ते आम्ही होऊ दिले नाही. पुढे बोलताना ते म्हणाले की,शेतकऱ्यांना जर चार पैसे मिळणार असतील तर केंद्र सरकारने देखिल धाडसी निर्णय घेणे गरजेचे आहे.
Share your comments