1. बातम्या

दिवसभरातील शेतीच्या महत्त्वाच्या बातम्या; २५ मे २०२१:वादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळाप्रमाणे मदत ते पंजाबमध्ये गव्हाचे विक्रमी उत्पादन

दिवसभरात राजकीय घडामोडीच्या अनेक बातम्या प्रसारित होत असतात. पण यात ज्यावर आपलं जीवन अवलंबून असतं अशा क्षेत्रातील बातम्या मात्र आपल्यापर्यंत पोहचत नाहीत. सर्वांना भाकरी देणाऱ्या अशा कृषी जगताच्या आणि शेतकऱ्यांविषयीच्या बातम्या जाणून घेण्यासाठी वाचा कृषी जागरण मराठी.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
शेतीच्या महत्त्वाच्या बातम्या; २५ मे २०२१

शेतीच्या महत्त्वाच्या बातम्या; २५ मे २०२१

दिवसभरात राजकीय घडामोडीच्या अनेक बातम्या प्रसारित होत असतात. पण यात ज्यावर आपलं जीवन अवलंबून असतं अशा क्षेत्रातील बातम्या मात्र आपल्यापर्यंत पोहचत नाहीत. सर्वांना भाकरी देणाऱ्या अशा कृषी जगताच्या आणि शेतकऱ्यांविषयीच्या बातम्या जाणून घेण्यासाठी वाचा कृषी जागरण मराठी.

तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे मदत दिली जाईल –मुख्यमंत्री : गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तौते चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

आयात बंद हटवल्याने कडधान्याचे दर कोसळले : केंद्र सरकारने कडधान्यं वरील आयात बंदी पूर्णपणे उठवल्यामुळे विदेशातून कडधान्याचे आवक मोठ्या प्रमाणात होत असून, स्थानिक बाजारपेठेमध्ये कडधान्याचे दर हे हमीभावापेक्षा ही खाली आले आहेत. उडीद, मुग आणि तूर यांच्या भावात दीड ते दोन हजार रुपयाची घसरण तसेच हरभराच्या दरात 600 ते 700 रुपयांची प्रतिक्विंटल घसरण झाली.

 

विद्यापीठे आणि खासगी अवजारांचा यांत्रिकीकरण योजना समावेश करा - कृषीमंत्री दादाजी भुसे : कृषी विद्यापीठांनी उत्पादित केलेले कृषी अवजारे आणि यंत्रे यांचे उत्पादन करण्यासाठी खासगी उत्पादकांची नियुक्ती करणे तसेच खासगी उत्पादकांनी उत्पादित आणि विकसित केलेल्या अवजारांचा राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

NABCONS Recruitment 2021: नाबार्डसाठी देशभरात भरती, दरमहा मिळेल १.५ लाख रुपयांचे वेतन : सरकारी नोकरी (Government job) च्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँके (National Bank for Agriculture and Rural Development) च्या सब्सिडियरी कंपनी नाबार्ड कंसल्टेंसी सर्विसेस (NABARD Consultancy Services) मध्ये ऑफ-फॉर्म डेव्हलपमेंटसाठी भरती केली जाणार आहे.

 

शेतकऱ्यांचे सहा महिने धरणे तरीही गव्हाचे पंजाबमध्ये विक्रमी उत्पादन : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब आणि आसपासच्या राज्यातील बरेचसे शेतकरी कोरोना संसर्गाची उद्रेकाच्या दरम्यानच जवळजवळ सहा ते सात महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. तरीही पंजाबमधील शेतकरी आंदोलनस्थळी असतानाही पंजाबमध्ये जवळजवळ गव्हाचे विक्रमी उत्पादन होऊन 13 मे पर्यंत 132 लाख 16 हजार 187 मेट्रिक टन गव्हाच्या पिकाची मंडईत विक्री झाली.

English Summary: Whole day breaking news of farming world 25 May 2021 Published on: 25 May 2021, 11:48 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters