राज्यात 2019 पासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. असे असताना आता राज्यात राजकीय घडामोडींमुळे मुख्यमंत्रिपद गमावून उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागलेले देवेंद्र फडणवीस यांनाच महाराष्ट्राची मुख्यमंत्रिपदाची सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून आले आहे.
यामुळे ठाकरे काहीसे मागे पडल्याचे दिसून येत आहे. ‘महाराष्ट्राचा महापोल’ सर्व्हेत सर्वात जास्त २५ टक्के जणांनी फडणवीस हे त्यांच्या मनातले मुख्यमंत्री असल्याचे सांगितले आहे. यामुळे 2024 मध्ये चित्र बदलू शकते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना २२ टक्के जणांनी पसंती दर्शवली आहे, तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १५ टक्के मिळवून तिसर्या स्थानावर आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे जिल्ह्यातील 'या' ७ तालुक्यात बैलगाडा शर्यत बंद! प्रशासनाचा निर्णय, लम्पीचा प्रादुर्भाव वाढला..
तसेच यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार १० टक्के आणि सुप्रिया सुळे ६ टक्के असा महाराष्ट्राचा पसंतीक्रम आहे. महाराष्ट्रातील तापर्यंतच्या सर्वात मोठ्या पॉलिटिकल सर्व्हेने महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. ६० हजारांहून अधिक सॅम्पल साईजच्या या सर्व्हेचा दुसरा टप्पा प्रदर्शित झाला.
त्यात महाराष्ट्राचा एकूण राजकीय कौल संभ्रमात असल्याचे चित्र दिसून आले. तसेच आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या, तर ‘एनडीए’कडे 48 टक्के मतांची बेगमी आहे. त्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून ३३ टक्क्यांवर आहे; तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ९ टक्के आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ६ टक्क्यांवर आहे.
दरम्यान‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ आघाडीच्या मतांच्या टक्केवारीत फारसा फरक नाही. ‘इंडिया’कडे ४३ टक्के कौल आहे. त्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांना प्रत्येकी १६ टक्के पसंती आहे.
तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ११ टक्के जणांनी पाठिंबा दिलेला दिसतो. याचा अर्थ कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीलासुद्धा स्वबळावर सत्ता स्थापण्यासाठी बरीच कसरत करावी लागेल. यामुळे याकडे अजून अनेक घडामोडी घडू शकतात.
राज्यात हातभट्टी मुक्त गाव अभियान राबविणार, मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
अजितदादा शब्दाला पक्के! माळेगाव साखर कारखान्याने दिला राज्यात सर्वाधिक 3411 रुपये दर..
Share your comments