
jay pawar weeding update
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांचं लग्न ठरलं आहे. जय पवार आता फलटणच्या पाटील कुटुंबाचे जावई होणार आहेत. जय पवार यांच्या आत्या अर्थातच खासदार सुप्रिया सुळे यांनी या लग्नाची माहिती सोशल माध्यमातून दिली आहे.
जय पवार यांची होणारी बायको आणि अजित पवारांची भावी सून ऋतुजा पाटील कोण आहेत ? असा प्रश्न सध्या सगळ्यांना पडला आहे. तर चला जाणून घेऊयात ऋतुजा पाटील नेमक्या कोण आहेत.
ऋतुजा पाटील कोण आहेत?
जय पवारची होणारी बायको ऋतुजा फलटणच्या प्रवीण पाटील यांची मुलगी आहे. प्रवीण पाटील हे सोशल मीडियाचं काम बघणारी कंपनी सांभाळतात. काही वर्षांपूर्वी जय आणि ऋतुजा यांची भेट झाली. ऋतुजा ही उच्च शिक्षित आहे. ऋतुजाची बहीण ही केसरी ट्रॅव्हल्सच्या केसरी पाटलांची सून आहे.
दरम्यान, ऋतुजा पाटील पवार कुटुंबाची सून होणार आहे. साखरपुड्याच्या आधी जय पवार आणि ऋतुजा यांनी आजोबा शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले आहेत. यावेळी त्याच्या आत्या सुप्रिया सुळे देखील त्यावेळी तेथे उपस्थित होत्या. या भेटीचे फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर करत जय पवार यांच्या लग्नाची माहिती दिली आहे.
Share your comments