गेल्या काही दिवसांपासून राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. असे असताना शेतकऱ्यांचे यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यामुळे विरोधक देखील आक्रमक झाले आहेत. आता मे महिना संपत आला तरी देखील हा प्रश्न कायम आहे. अतिरिक्त ऊसाला साखर कारखान्यांचा मनमानी कारभारच जबाबदार असल्याचा आरोप (Swabhimani Shetkari Sanghtna) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.
यामुळे संबंधित साखर कारखाना प्रशासनावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.महत्वाची बाब म्हणजे जे कारखान्याचे सभासद होते त्यांचेच ऊस यावेळी उशिरा तोडले गेले आहेत. यामुळे सभासदाची देखील नाराजी कारखान्यावर आहे. सध्या मराठवाडा विभाग आणि या विभागात जालना जिल्ह्यात अधिकचा ऊस फडातच आहे.
ज्यादा ऊस असल्याने कारखाना प्रशासनाने सुरुवातीपासूनच याकडे लक्ष देणे गरजेचे होते. प्रशासन शेवटी कामाला लागले, यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. ना प्रशासनाने ना साखऱ कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊस प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. आता अंतिम टप्प्यात सर्व यंत्रणा यासाठी राबतेय असे भासवले जात आहे. यामध्ये उसाच्या वजनात मोठी घट होणार आहे. त्यातच यंदा उन्हाळा अधिक तीव्र असल्याने अनेकांचा ऊस हा जळून गेला.
40 गोणी कांदा, शेतकऱ्याला आडतवाल्यालाच द्यावे लागले 7 रुपये, सांगा कसा जगणार शेतकरी
पश्चिम महाराष्ट्रातील यंत्रणा मराठवाड्यात आणली गेली असली तरी मराठवाड्यात सर्वाधिक ऊस हा जालना जिल्ह्यातच आहे. यामुळे या शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. अनेकांनी पाणी उपलब्ध असल्याने पहिल्यांदा ऊस लावला आणि आता हेच शेतकरी पुन्हा ऊस नको रे बाबा अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. या शेतकऱ्यांना आपला ऊस तोडण्याची मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे.
आता शेतकरी संघटनेच्या वतीने गाळपाअभावी उभ्या असलेल्या उसाला एकरी एक लाख रुपये अनुदान मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांचे यामध्ये मात्र हाल सुरु आहेत. यामुळे आता पुढील पिकांचे नियोजन फसले आहे.
महत्वाच्या बातम्या;
मोठी बातमी! एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा, साखर सहसंचालकांचे आदेश
कृषी विकास दराबाबत आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मोठा दिलासा..
पुराच्या पाण्यात पाय भिजतील म्हणून भाजप आमदार कर्मचाऱ्याच्या पाठीवर
Share your comments