राज्यातील रब्बी हंगामातील हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. रब्बी हंगामात लवकर पेरल्या गेलेल्या हरभऱ्याचे उत्पादन सध्या बाजारपेठेत बघायला मिळत आहे, परंतु हरभरा उत्पादक शेतकरी सध्या कमालीचे संभ्रमावस्थेत बघायला मिळत आहे. राज्यात हरभरा उत्पादक शेतकरी हरभरा विक्रीसाठी लगबग करत आहेत, शासनाने हरभरा खरेदीसाठी नुकतेच आदेश जारी केले आहेत, मात्र शाशनाचे आदेश हे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी सिध्द होत आहे. कारण की अजून मायबाप सरकारने हरभरा नाफेड खरेदी करणार एफसीआय याबाबत कुठलाच निर्णय घेतलेला बघायला मिळत नाही. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी मोठ्या संभ्रमावस्थेत आहेत.
हरभरा हमी भावात खरेदी करण्यासाठी मायबाप सरकारने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना नोंदणी प्रक्रिया करण्याचे आव्हान केले आहे त्या अनुषंगाने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी पोर्टलवर हजेरी लावली खरी मात्र पोर्टल अजूनही ऍक्टिव्ह नसल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे मायबाप सरकारने आदेश काढूनही पोर्टल सुरू केले नसल्याने नोंदणी करावी कशी? असा सवाल हरभरा उत्पादक शेतकरी उभा करत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सोमवारपासून हमीभावात हरभरा खरेदी करण्यासाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया प्रारंभ होऊ शकते. या घटनेवरून सरकारी काम आणि सहा महिने थांब हा प्रत्येय आला असल्याचे शेतकरी बांधव आपले मत व्यक्त करत आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, रब्बी हंगामात पेरले गेलेल्या हरभराचे पीक उत्पादन देण्यास तयार झाले आहे, या अशा परिस्थितीत बदलत्या हवामानामुळे हरभरा पिकाला मोठा फटका बसू शकतो त्या अनुषंगाने हरभरा उत्पादक शेतकरी हरभऱ्याची लवकरात लवकर काढणी करून विक्री करण्यासाठी लगबग करीत आहेत, मात्र शासनाच्या या धोरणामुळे आणि हलगर्जीपणा मुळे अद्यापही हरभराची हमीभावात खरेदी सुरू झालेली नाही.
सध्या हरभराच्या हंगामाची सुरुवात असल्याने बाजारपेठेत हरभऱ्याला समाधानकारक बाजार भाव मिळत आहे. मात्र असे असले तरी, जसजसा हंगाम पुढे जाईल तसतसे हरभऱ्याचे दर पडतील अशी हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना आशंका आहे. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी मायबाप शासनाकडे लवकरात लवकर हमीभाव केंद्रे सुरू करण्याची मागणी केली आहे, त्या अनुषंगाने शासनाद्वारे सुरू करण्यात आलेले पोर्टल लवकरात लवकर कार्यान्वित केले जावे असे देखील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या रब्बी हंगामातील हरभरा नुकताच काढणी होत आहे त्यामुळे त्यामध्ये आद्रता अधिक प्रमाणात बघायला मिळत आहे. हरभऱ्यात आदर्ता अधिक असल्याने हमीभाव खरेदी केंद्रांकडून हरभरा खरेदी नाकारली जाऊ शकते, तसेच खरेदी केंद्र कडून हरभरा वाळवून आनण्याची शिफारस शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे.
एकंदरीत सध्या हरभराचा हंगाम नुकताच सुरू झाला आहे, त्यामुळे हरभऱ्याची आवक बाजारपेठेत कमी बघायला मिळत आहे. त्यामुळे खुल्या बाजारपेठेतील हरभऱ्याला समाधानकारक बाजारभाव प्राप्त होत आहे. मात्र हंगाम जसजसा पुढे जाईल तसतसे हरभऱ्याचे दर खाली येतील अशी आशंका हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना आहे त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हमीभाव केंद्रे सुरू करण्याची शासनाकडे मागणी केली आहे.
Share your comments