Chandrayaan-3 Update
भारताने अवकाशात सोडलेले चांद्रयान-३ आज (दि.२३) चंद्राच्या पृष्ठभागावर सायंकाळी ६ वाजतानंतर उतरणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशात याकडे लागले आहे. चंद्रावर चांद्रयान लॅन्डींग झाल्यावर ते चार तासांनी तेथून माहिती गोळा करण्यास सुरुवात करणार आहे. या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सहा चाकी प्रग्यान रोव्हर चंद्रावर भारताच्या राष्ट्रीय चिन्हांची छाप सोडणार आहे.
अवकाशात सोडण्यात आलेले चांद्रयान आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँन्डींग करणार आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांनाच यामध्ये यश आले आहे. त्यामुळे भारतही या देशांच्या यादीमध्ये सामील होणार आहे. यावेळी चांद्रयान ३ रोव्हर आणि लँडर जात आहेत. चांद्रयान २ सोबत पाठवलेले ऑर्बिटर अजूनही तिथेच कार्यरत आहे. चांद्रयान-२ २०१९ मध्ये पाठवण्यात आले होते. पण ते सॉफ्ट लँडिंग करू शकले नाही.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय आहे?
चांद्रयान ज्या ठिकाणी उतरणार आहे. त्याठिकाणी दक्षिण ध्रुवावर मोठे डोंगर आणि खड्डे आहेत. सूर्याची किरणं तिरपी पडतात. बहुतांश भागामध्ये अंधार असतो. त्यामुळे या भागात अनेक खड्डे अब्जावधी वर्षापासून अंधारात आहेत. अंधारामुळे हे खड्डे खूप थंड आहेत. या भागात तापमान -२०३ डिग्री सेल्सियस आहे. इथे पाणी आणि खनिज सापडण्याची शक्यता आहे.
चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगसाठी सर्वत्र प्रार्थना
चांद्रयान-३ च चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग व्हाव, यासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे. तर अनेकांनी देवांपुढे अभिषेक देखील घातले आहेत. पुण्याील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मंदिरात आज पहाटे भालचंद्र गणेशास अभिषेक करण्यात आला. यासाठी दूध दही विविध फळांचे रस सुकामेवा आदींचा वापर करण्यात आला आहे. चांद्रयान २ हे लॅन्डींग होताना यात अडचण आली होती. त्यामुळे यावेळी शास्त्रनांनी भरपूर काळजी घेतली आहे.
Share your comments