काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू होती. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबीर पार पडले होते. शिबिराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन हजर राहिले होते.
असे असताना अजित पवार हे अनुपस्थित असल्याने मोठी चर्चा सुरू झाली होती. यावर आता त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. आपण परदेशात होतो अशी माहिती त्यांनी दिली. अजित पवार आज मावळच्या दौऱ्यावर आहेत.
अजित पवार यांनी म्हटले की, खोकला सुरू झाला होता, त्यानंतर परदेशात गेलो होतो. आता तब्येत बरी आहे. पण काहीही बातम्या सुरू झाल्या होत्या, असे म्हणत त्यांनी चर्चांना पूर्ण विराम दिला. गेली चार-पाच वर्षे मी परदेशात गेलो नव्हतो.
घ्यायक गाडी, पाण्याला जार आणि चहा, मजुरांना आलेत अच्छे दिन..
त्यामुळे 4 नोव्हेंबर रोजी मी परदेशात गेलो आणि काल मध्यरात्री मी पोहचलो. थकलो होतो, पण आज ही इथं आलो नसतो तर आणखी वेगळ्याच बातम्या लागल्या असत्या, असेही अजित पवारांनी सांगितले आहे.
तसेच दादा इथं आले, दादा इथं नाही आले, दादा गायब झाले, दादा नाराज झाले. काहीही बातम्या सुरू होत्या. वारेमाप चर्चा करायची. दादा वाचून ह्यांचं काय नडते काय कळत नाही. दादाला काही खाजगी आयुष्य आहे की नाही? उगाच काहीही उठवून बदनामी करायची, असेही ते म्हणाले.
Aurangabad: कृषिमंत्र्यांच्याच तालुक्यात लम्पीचा कहर, सर्वाधिक जनावरे सिल्लोड तालुक्यात मृत्युमुखी
राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरून राज्यभरात राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मात्र, अजित पवार यांनी मौन बाळगल्याने चर्चांना उधाण आले होते.
महत्वाच्या बातम्या;
FRP: शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी नाहीच, आंदोलन पेटण्याची शक्यता
जनावरांचे बाजार कधी सुरू होणार? पशुसंवर्धन विभागाने दिली महत्वाची माहिती
या भन्नात आयडीयामुळे मिरचीच्या कीड व्यवस्थापनाची चिंताच मिटली आहे
Share your comments