सध्या गेल्या काही महिन्यांपासून बाजारात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी सुरू झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत. आता राज्याच्या बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली.
तसेच पुढील काही दिवसांमध्ये टोमॅटोची आवक वाढून दर कमी होतील, असा अंदाज सरकारसह काही संस्थांनी व्यक्त केला आहे. बाजारात टोमॅटोला आजही ७० ते ९० रुपये प्रतिकिलोचा भाव मिळाला.
तर किरकोळ विक्री १३० ते १५० रुपयांनी सुरु होती. गुणवत्तेच्या टोमॅटोचे भाव यापेक्षा जास्त होते. जुलैमध्ये तीन आठवडे अनेक टोमॅटो उत्पादक पट्ट्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे टोमॅटोची गुणवत्ता कमी झाली. पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न, नियुक्त्या जाहीर...
जुलै महिन्यातील टोमॅटो लागवडी वाढल्याचेही शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सांगितले. हा माल दोन ते अडीच महिन्यांमध्ये बाजारात येण्यास सुरुवात होईल. पण मागील महिन्यात झालेल्या पावसाने काही भागांमध्ये टोमॅटो पिक आणि रोपांनाही फटका बसला.
माळवी गाय तुम्हाला श्रीमंत करेल, सर्वात जास्त दूध देणाऱ्या जातींपैकी एक
सरकार तसेच काही संस्थांनी टोमॅटोचे भाव ऑगस्ट महिन्याच्या शेवटी कमी होऊ शकतात. भाव ३० रुपयांपेक्षा कमी होतील, असे सरकार आणि काही संस्थांनी सांगितलं होते. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत स्पष्ठता येईल.
आता 'त्या' जमिनीचे देखील होणार व्यवहार! पुनर्वसनाच्या जमिनीबाबत विखे पाटलांची मोठी घोषणा...
राजू शेट्टींची मोठी घोषणा! छोट्या पक्षांची एकजूट करत नव्या आघाडीची केली घोषणा...
पीककर्जासाठी सीबिल स्कोरची अट रद्द करावी! सरकारचा नियम फक्त कागदावर बँका ऐकत नाहीत...
Share your comments