1. बातम्या

यंदाच्या वर्षातील पीएम किसानचा पहिला हप्ता कधी मिळणार?

देशातील शेतकरी पीएम किसानच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदाच्या वर्षाचा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार होता आणि दुसरा जुलै महिन्यात मिळणार होता परंतु अजून या हप्ताबाबत कोणतीही माहिती शेतकऱ्यांना मिळाली नाही.

When will the first installment of PM Kisan be received this year?

When will the first installment of PM Kisan be received this year?

देशातील शेतकरी पीएम किसानच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदाच्या वर्षाचा  हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार होता आणि दुसरा जुलै महिन्यात मिळणार होता परंतु अजून या हप्ताबाबत कोणतीही माहिती  मिळाली नाही. पहिला हप्ता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी आशा व्यक्त केली जात होती. परंतु एप्रिल महिन्यात हा हप्ता जमा झाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झाली.

पहिला हप्ता मे महिन्यात येणार असल्याची शक्यता आहे. पीएम किसानच्या पहिल्या जमा झाला नाही कारण eKYC पूर्ण झाले नाही. तसेच अनेक शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांक आधारसोबत अपडेट केलेले नाहीत. या कारणामुळे या हप्त्याला वेळ लागण्याची शक्यता आहे. दरम्यान ई-केवायसी पूर्ण करण्याची शेवटची तारीख ३१ मे आहे.

हप्ता न मिळाल्यास तुम्ही पुढील क्रमांकावर संपर्क करू शकता.

पीएम किसान योजनेचा टोल फ्री नंबर: 18001155266

पीएम किसान हेल्पलाईन नंबर:155261

पीएम किसान लँडलाईन नंबर्स: 011—23381092, 23382401

पीएम किसानचे अपडेट केलेले हेल्पलाईन नंबर: 011-24300606

पीएम किसान हेल्पलाईन: 0120-6025109

ई-मेल आईडी: pmkisanict@gov.in

पीएम किसान पोर्टलवर तुमचे स्टेटस कसे पहाल

pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करा

उजव्या बाजूला तुम्हाला Farmers Corner दिसेल

Farmers Corner वर क्लिक करा

आता पर्यायातून, Beneficiary Status वर क्लिक करा

तुमचे स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, बँक खाते तपशील द्यावा लागेल. तुम्ही वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुमचे नाव यादीत असल्यास ते तुम्हाला सापडेल.

महत्वाच्या बातम्या 
रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या रेपो दर वाढीचा तुमच्यावर काय परिणाम होईल?
शब्बास रे पठ्या..! एक एकरात घेतले तब्बल १२ लाखांचे उत्पन्न




English Summary: When will the first installment of PM Kisan be received this year? Published on: 06 May 2022, 11:28 IST

Like this article?

Hey! I am शैलेश म्हातारदेव डमाळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters