पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना एक केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे व या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून शेतकऱ्यांना देण्यात येतात हे आपल्याला माहिती आहे. तीन टप्प्यांमध्ये दोन हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. म्हणजेच दर चार महिन्यांनी दोन हजाराचा हप्ता म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये या माध्यमातून मिळतात.
ही योजना खूप महत्त्वाची असून या अंतर्गत आतापर्यंत 14 हप्त्यांचे वितरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे या केंद्र सरकारच्या योजनाच्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्य शासनाने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करण्यात आली होती.
पीएम किसान योजनेसाठी जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेत देखील सहा हजार रुपये वार्षिक देण्यात येणारा असून दोन हजार रुपयांचा एक हप्ता अशा एकूण तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
या योजनेकरिता 4000 कोटी रुपयांची तरतूद महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. या योजनेचा पहिला हप्ता हा पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यासोबतच देण्याचे एकंदरीत नियोजन करण्यात आलेले होते. परंतु तो देणे शक्य झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हा हप्ता केव्हा मिळणार हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
या कारणांमुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता रखडला
नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता हा काही तांत्रिक समस्यांमुळे रखडला असून या टेक्निकल समस्या आता लवकरात लवकर सोडवण्यासाठी महाआयटीच्या माध्यमातून वेगात प्रयत्न केले जात आहेत.
त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाआयटीच्या माध्यमातून आलेली तांत्रिक समस्या सोडवण्यात येण्याचा दवा केला जात असून लवकरच या योजनेचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. आपण एकंदरीत अंदाज पाहिला तर चालू ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पर्यंत या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना वितरित होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
Share your comments