मित्रांनो देशात मोठ्या प्रमाणात द्राक्ष लागवड केली जाते. आपल्या राज्यातही द्राक्षे मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जातात. यावर्षी द्राक्ष बागायतदारांना हंगामाच्या सुरुवातीपासूनच मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खरं पाहता, गेल्या अनेक वर्षांपासून द्राक्ष बागायतदार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम संकटात सापडत राहिला आहे मात्र यंदा अडचणी अधिक वाढल्या आहेत.
द्राक्ष उत्पादकांना यंदा एका वेगळ्या आणि भयावह समस्येला सामोरे जावे लागत आहे. खरं पाहता राज्यातील द्राक्षांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. या हंगामात शेतकऱ्यांनी मोठी मेहनत घेऊन नैसर्गिक पद्धतीने शेती केली आहे.
मात्र असे असले तरी द्राक्ष बागायतदारावर संकटांची मालिका कायम आहे. सध्या राज्यातील द्राक्ष बागायतदारांचे द्राक्ष व्यापारी खरेदी करत नसल्याने अक्षरशः फळबागांमध्ये द्राक्षे सडत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा लावल्या आहेत. आता शेवटच्या टप्प्यात चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती, मात्र त्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी येतं नसल्याने द्राक्ष बागेतच खराब होत आहेत. अहमदनगर जिल्हा प्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. याशिवाय खराब हवामानामुळे बेदाणे तयार करणे शक्य नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील रहिवासी शेतकरी व द्राक्ष बागायतदार राजेंद्र लोखंडे गेल्या अनेक वर्षांपासून द्राक्ष शेती करीत आहेत. यावर्षी मोठ्या मेहनतीने त्यांनी साडेतीन एकरात द्राक्षाचे उत्पादन घेतले आहे. खरं पाहता राजेंद्र यांनी उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने पीक पद्धतीत बदल करत द्राक्षाची लागवड केली होती. मात्र राजेंद्र यांची ही आशा धुळीस मिळत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीला राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाचा कहर बघायला मिळाला. हंगाम अंतिम टप्प्यात असताना देखील अवकाळी पाऊस कायम राहिल्याने द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदारांच्या उत्पादनात घट झाली आणि विशेष म्हणजे द्राक्षांची गुणवत्ता ढासळली. सध्या द्राक्ष काढणीयोग्य झाली आहेत मात्र व्यापारी खरेदी करायला तयार नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
त्यामुळे बागेतच फळे खराब होऊ लागली आहेत. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक राजेंद्र लोखंडे यांनी सांगितले की, त्यांनी 3 एकर क्षेत्रात द्राक्षबाग लावली आहे, मात्र व्यापाऱ्यांअभावी द्राक्षे वाया जात आहेत. आतापर्यंत राजेंद्र यांची 70 टन द्राक्षे खराब झाली आहेत. यामुळे त्यांना लाखोंचे नुकसान सहन करावे लागत असल्याचे सांगितले जात आहे.
Small Business Idea 2022: कमी गुंतवणूकीत सुरु करा 'हा' व्यवसाय आणि कमवा लाखों; वाचा याविषयी
दरम्यान द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्ष खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आरोप करीत सांगितले की, व्यापाऱ्यांनी आधीचं कमी भावात द्राक्षांची खरेदी करून ठेवली आहे. यामुळे आता व्यापारी द्राक्ष खरेदी करीत नसून त्यांच्याजवळचा माल विक्री करण्यात व्यस्त आहेत.
एकंदरीत व्यापाऱ्यांनी द्राक्ष बागायतदारांची आर्थिक कोंडी केली असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे. निश्चितच गेल्या अनेक वर्षांपासून संकटांचा सामना करत असलेल्या द्राक्ष बागायतदारांना या नवीन संकटामुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे.
'या' ठिकाणी 17 हजारात भेटतेय TVS Jupiter स्कूटर; वाचा याविषयी
Share your comments