1. बातम्या

शेतकऱ्यांना उसाचे बिल मिळणार कधी? नाहीतर या तारखेला आंदोलनाचा इशारा

किरण भेकणे
किरण भेकणे
sugarcane bill

sugarcane bill

२०२० - २१ मधील राज्यात ऊस(sugarcane) गाळणी हंगाम हा एप्रिल महिन्यातच संपला परंतु काही अशा गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणी मध्ये दिसत आहे. जसे की राज्यातील काही असे साखर कारखाने आहेत.त्यानी शेतकऱ्यांची देणी थकवलेली आहेत तर काही शेतकऱ्यांना बिल द्यावे   लागेल म्हणून चेक च वटले नाहीत अशी भोंगळ कारणे देण्याचं चित्र समोर आले आहे. शेतकऱ्यांना उसाचे बिल भेटले नसल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक  अडचणीत  आलेला आहे, जे की कारखाने शेतकऱ्यांना उसाची बिले देत नाही अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून समजलेले आहे.

शेतकऱ्यांचे पैसे पाच महिन्यांपासून थकवले:-

अंबड तालुक्यामधील हजारो शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात ऊस सोलापूर जिल्ह्यातील इंद्रेश्वर शुगर्स तसेच लातूर जिल्ह्यातील श्री साई बाबा शुगर्स  शिवणी  तर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील सचिन घायाळ शुगर अशा या तीन कारखाना दारांनी मागील पाच महिन्यापासून शेतकऱ्यांची कोटी रुपये  बिले थांबवलेली आहेत. यामध्ये सर्वात विशेष म्हणजे साईबाबा शुगर्स या कारखान्याने जानेवारी मध्ये शेतकऱ्यांना दिलेले चेक खात्यावर रक्कम नसल्याने वटले नाहीत.जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२१ या महिन्यात शेतकऱ्यांची देणी थांबवली आहेत जे की उसाचे बिल वेळेवर मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी  सुभाष  रोटे तसेच नारायण आमटे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा:बदलत्या हवामानामुळे डाळिंब पिकावर रोगांचा प्रार्दुभाव

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा:-

शेतकऱ्यांची बिले अडवली असल्यामुळे स्वाभिमान शेतकरी संघटनेने औरंगाबाद विभागाच्या प्रादेशिक सह संचालक  कार्यलयात  १५  ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येणार आहे असे इशारा दिलेला आहे जे की ही महिती स्वाभिमानी शेतकरी संघटना जालना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे  यांनी  दिलेली  आहे .भाजपचे खासदार संजय काका पाटील यांचा नागेवाडी चा साखर कारखाना तसेच तासगाव चा साखर कारखान्याने जवळपास ३५ ते ४० कोटी रुपयांचे  बिल  अडवून ठेवलेले होते त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील महिन्यात तिथे आंदोलन केले होते.

त्यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी आश्वासन दिले आहे की आम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांची बिले काढू.परंतु संतापलेल्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली तासगाव मध्ये संजय काका पाटील यांच्या कार्याल्यासमोर मोर्चा काढला आणि यानंतर त्यांनी लगेच चेक वाटप चालू केले.

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters