मध्य प्रदेशातील इंदूरमधील एका भाजी विक्रेत्याच्या मुलीनं सिव्हिल जज रिक्रुटमेंट एक्झाममध्ये यश मिळवलं आहे. तिने हे सिद्ध करून दाखवल आहे की प्रामाणिकपणे कष्ट केले तर काहीही अशक्य नाही, अंकिता नागर असं या मुलीचं नाव आहे. अंकितानं या परीक्षेत एससी मधून देश पातळीवर पाचवा क्रमांक मिळवला आहे. 'एएनआय'नं दिलेल्या वृत्तानुसार तिचे वडील अशोक नागर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात.
अंकिता म्हणते लॉकडाउनच्या काळात आपल्याला अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळाला होता. अभ्यासासाठी तिने यूट्युबची मदत घेतली होती. अंकिता सांगते तिने यूट्युबवर ऑनलाईन अभ्यास केला. सरकारकडून शिष्यवृत्ती मिळाली असली तरी काही प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, असं अंकितानं 'एएनआय'ला सांगितलं.
अंकिताला डॉक्टर होण्याची इच्छा होती. मात्र, मेडिकल अॅडमिशनची फी भरणं शक्य नसल्यामुळे तिनं सिव्हिल जज एक्झामची तयारी सुरू केली होती. अंकितान बहुतेक शिक्षण सरकारी स्कॉलरशीपच्या मदतीनं पूर्ण केलं आहे. सर्व सुविधा असूनही अभ्यास न करणाऱ्या मुलांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. लॉकडाऊन दरम्यान आणि नंतर फॉर्म भरताना मला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. पण, मी त्यातून मार्ग काढला. अनेकांनी मला लग्न करण्याचा सल्ला दिला होता. माझ्या पालकांनी मात्र मला माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले, असे ती म्हणाली.
अंकिताच्या पालकांनी सांगितलं की, आम्ही अंकिताला शिक्षणाची संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गेल्या सहा वर्षांत आम्ही आर्थिक तडजोडही केली. अंकीतानेही कोणत्याही विशेष सोयीसुविधा नसताना कसून अभ्यास केला आणि परीक्षा उत्तीर्ण केली. आम्हाला तिचा अभिमान वाटतो. कोणत्याही पालकांनी त्यांच्या मुलींना लग्नासाठी जबरदस्ती करू नये. त्याऐवजी अगोदर त्यांना शिक्षण दिलं पाहिजे.
अंकिताचे वडील अशोक नागर म्हणाले, "आमच्या कुटुंबाने खूप संघर्ष केला आणि त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी काही पैसे वाचवले. याच पैशांमुळे अंकिताला शिक्षण घेता आले. आता आनंद व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. '' लोक मुलगा आणि मुलगी यांच्यात फरक करतात. असे करू नका.मुलापेक्षा मुलगी चांगली आहे. आता सगळे माझे अभिनंदन करायला येत आहेत.
अंकिताचे वडील अशोक नागर म्हणाले, "आमच्या कुटुंबाने खूप संघर्ष केला आणि त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी काही पैसे वाचवले. याच पैशांमुळे अंकिताला शिक्षण घेता आले. आता आनंद व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. '' लोक मुलगा आणि मुलगी यांच्यात फरक करतात. असे करू नका.मुलापेक्षा मुलगी चांगली आहे.आता सगळे माझे अभिनंदन करायला येत आहेत
. मी माझ्या मुला-मुलींना सारखीच वागणूक दिली आहे. त्यांना शिक्षणाची समान संधी दिली आहे,' अशी प्रतिक्रिया अंकिताची आई लक्ष्मी नागर यांनी दिली आहे. गरीब कुटुंबातील अंकितानं अभ्यास करून यश मिळवलं आहे. तिच्या या कामगिरीमुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.
महत्वाच्या बातम्या
तरुण शेतकरी मित्रांनो! शेती तर नक्कीच करा परंतु शेतीला जोडधंदा म्हणून बटाटा प्रक्रिया उद्योगाचा विचार करा
असा कसा हा आडमुठेपणा! लिलाव झाला तरी कांदा घेण्यास व्यापाऱ्याची टंगळमंगळ; अखेर शेतकऱ्याने केली कंप्लेंट अन…..
Share your comments