सोलापूर बाजार समिती मध्ये गेल्या काही दिवसापासून विक्रमी कांद्याची आवक होत आहे. कारण गेल्या तीन-चार हंगामाचा विचार केला तर कांद्याला येथे चांगला भाव मिळाला आहे.
सोलापूर बाजार समितीमध्ये महाराष्ट्र तसेच कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यातून देखील कांदा मोठ्या प्रमाणात दाखल होतो. या बाजार समितीत कांद्याची आवक जास्त होत असल्याने बाजार समिती शेतकऱ्यांचा कुठलाही विचार न करता बाजार बंद ठेवत असते. यामुळे शेतकरी संतप्त झाले असून या बाजार समितीच्या मनमानी कारभाराविरुद्ध शेतक-यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.त्यावर बाजार समितीचे म्हणणे आहे की कांद्याची आवक वाढली तर लीलाव होण्यासाठी बराच वेळ लागतो त्यामुळे बाजार बंद ठेवावा लागतो.
परंतु महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने या निर्णयाला शेतकऱ्यांच्या विरोधी ठरवत या विरोधात मोर्चा उघडला आहे. कांद्याचे बाजार समिती दोन दिवस बंद ठेवले जाते व नंतर कांद्याचे लिलाव सुरू केले जातात.या वेळी नेमके होते अशी की दुसर्या दिवशी आवक वाढते आणि त्याचा परिणाम भावावर देखील होतो. ही गोष्ट लक्षात घेऊन कांद्याचे लिलाव दररोज सुरू करावेत अशी मागणी कांदा उत्पादन संघटनेचे नेते संदीप चिपडे यांनी केली आहे.
यावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे म्हणणे…..
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे यांनी टीव्ही नाईन शी बोलताना सांगितले की, सोलापूर बाजार समिती ज्याप्रकारे आवक वाढल्याचे कारण देते व बाजार बंद ठेवत आहे त्यामुळे कांदा उत्पादकांचे दुहेरी नुकसान होत आहे
कारण बाजारात अधिक आवक झाल्याचे सांगून एक-दोन दिवस लिलाव थांबवले जात आहेत. या अगोदर असं कधी घडलं नव्हतं शेतकऱ्यांकडून कमी भावात कांदा खरेदी केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.पुढे बोलताना दिघोळे म्हणाले की,कांदा बाजार दररोज सुरू करावा अशी मागणी कांदा उत्पादक संघटनेने केली आहे.यासाठी संघटनेने बाजार व्यवस्थापनाला पत्र दिले आहे.(स्त्रोत-न्यूज18लोकमत)
Share your comments