यंदा कापुस हा विक्रमी भावात विकला जात आहे, याचे कारण म्हणजे कापसाचे उत्पादन हे पावसामुळे घटले आहे आणि मागणी हि अधिक आहे. मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाल्यामुळे कापसाला विक्रमी भाव मिळताना दिसत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या घामाला सन्मानाचे मोल मिळत आहे. पण कापसाला जरी विक्रमी भाव मिळत असला तरी कापुस विक्री करताना जर सावधानता बाळगली नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.
शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसात बुलढाणा जिल्ह्यात तसेच राज्यातील इतर काही भागात पावसाने हजेरी लावली याचा वाईट परिणाम हा अनेक पिकावरती तर झालाच शिवाय यामुळे शेतकऱ्यांना कापुस विक्रीत विलंब देखील होतो आहे. कापूस विक्री करताना शेतकऱ्यांनी बेजबाबदार पणे वागू नये, आणि विशेष काळजी घ्यावी असे बुलढाणा येथील बाजार समित्या शेतकऱ्यांना आवाहन करत आहेत. शेतकऱ्यांनी आपला कापुस हा परवाना असलेल्या व्यापाऱ्यालाच विकावा, विना परवाना व्यापाऱ्याला कापुस विकला तर मोठी फसवणूक होऊ शकते. विना परवाना व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात कापुस खरेदी केला तर त्यांच्यावर कडक कार्यवाही हि केली जाईल असे बुलढाण्याच्या बाजार समित्यांनी स्पष्ट केले आहे तसेच शेतकऱ्यांना सल्ला देखील दिला आहे की, कापूस विक्री हि परवानाधारक व्यापाऱ्यांकडेच करावी.
परवाना नसताना देखील राज्यात अनेक ठिकाणी व्यापारी बिनधास्त कापसाची खरेदी करतात, मात्र अशा व्यापाऱ्यांनी खरेदी केली तर शेतकऱ्यांची फसवणूक हि होऊ शकते. शेतकरी देखील ह्या गोष्टी जाणुन आहेत पण तरी देखील शेतकरी आपला कापूस अशा व्यापाऱ्यांना विकतो. आणि आपले नुकसान स्वतःच्याच हाताने करून घेतो.शेतकरी मित्रांनो जसं की आपणांस ठाऊक आहे कोणताही शेतमाल खरेदी करण्यासाठी परवाना म्हणजे लायसन्स आवश्यक असते, कापुस खरेदी करण्यासाठी देखील लायसन्स अनिवार्य असते, शेतमाल खरेदीसाठी लागणारे लायसन्स हे बाजार समिती देत असते आणि याशिवाय शेतमाल खरेदी करणं हा कायद्याने गुन्हा देखील आहे.
मात्र असे असले तरी कापुस बाजारात आला की, अनेक हावशे आपले दुकान खोलतात आणि कापूस खरेदी करायला सुरवात करत्यात. तसेच काही महाभाग व स्वयंघोषित व्यापारी गावा-गावात हजेरी लावून शेतकऱ्यांकडून कापुस खरेदी करतात. जर अशा व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनी कापूस विकला आणि व्यवहारात काही गडबड झाली, फसवणूक झाली तर बाजार समित्या हस्तक्षेप करत नाहीत. शिवाय असे व्यापारी कापुस मोजणीत सुद्धा धांधली करू शकतात आणि शेतकऱ्यांना गंडवू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. म्हणुन कापुस हा नेहमी परवानाधारक व्यापाऱ्याकडे विकावा असे सांगितलं जात आहे.
Share your comments