सर्वच बाबतीत महागाई वाढत चालली आहे. येत्या काळात गव्हाचे भाव (Wheat prices) देखील वाढण्याची शक्यता आहे. गव्हाच्या वाढत्या भावातून दिलासा मिळणार नसल्याचा अंदाजही वर्तवला जात आहे. येत्या काही दिवसांत गव्हाचे दर 3 हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
जगभरातील गव्हाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला गव्हाच्या दरात चढउतार पाहायला मिळाला. मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात भारतातून गव्हाच्या निर्यातीच्या दृष्टीकोनातून जागतिक स्तरावर गव्हाची निर्यात झाल्यामुळे भावात चांगली वाढ झाली होती.
चिंताजनक : महाराष्ट्रात दोन दिवस गारपिटीची शक्यता
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2022-23 या वर्षासाठी गव्हाचे सरकारी खरेदीचे लक्ष्य 44.4 दशलक्ष मेट्रिक टन ठेवण्यात आले आहे. जे वार्षिक आधारावर पाहिले तर 2.4 टक्के अधिक आहे. हे लक्ष्य भारताने पूर्ण केले तर गव्हाच्या खरेदीची इतिहासात विक्रमी खरेदी म्हणून नोंद होईल.
दुसरीकडे, निर्यातीची मागणी वाढल्यामुळे, गव्हाची किंमत एमएसपीच्या वर जात आहे. यामुळे आता गहू ३ हजारांचा टप्पा ओलांडणार अशी शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Weather Update : मेघराजा यंदाही चांगलाच बरसणार...
कांदा दराचा प्रश्न मिटणार; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने ठरवली रणनिती
Share your comments