1. बातम्या

व्हाट्सअप पे ; कसे करणार व्हाट्सअपवरून ट्रांजेक्शन प्रक्रिया

KJ Staff
KJ Staff


व्हाट्सअप ने भारतामध्ये पेमेंट फीचर लॉन्च केले आहे.  व्हाट्सअप पे ला हळूहळू रोल आउट करीत आहे. जर तुम्हाला अजूनपर्यंत व्हाट्सअप वर हे नवीन फिचर दिसत नाही तर काळजी करण्याची गरज नाही. हे फिचर लवकरच तुम्हाला वापरण्यासाठी उपलब्ध होईल.या फिचरला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या भागीदारीने डिझाईन करण्यात आले आहे. ही प्रोसेस युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआयवर आधारित पेमेंट पद्धत आहे. या फीचरचा वापर करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मोबाईलमधील अँड्रॉइड या आयओएस (IOS)च्या लेटेस्ट व्हर्जनवर वापरता येईल. तसेच महत्त्वाचे म्हणजे तुमचा व्हाट्सअप नंबर हा तुमच्या बँक अकाउंटसोबत लिंक असावा.  यालेखात आपण सविस्तर याबाबत माहिती घेऊ.

सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे, तुम्ही तुमच्या व्हाट्सअप ओपन करा. व्हाट्सअप ओपन करून सेटिंगमध्ये जाऊन पेमेंट्स या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर ॲड पेमेंट मेथड (payment Method) वर क्लिक करून आपल्या बँकेची निवड करावी. बँक निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर (व्हेरिफाय)तपासावा लागेल. त्यानंतर एसएमएसवर क्लिक करावे. त्यानंतर व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण होण्याचा वाट पहावी. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमची बँक डिटेल्स खालील खाली दिलेल्या पेमेंट पद्धतीमध्ये ऍड होईल.हे सगळे प्रक्रिया झाल्यानंतर व्हाट्सअप चॅट ओपन करावे व त्यातील अटॅचमेंट आयकॉनवर क्लिक करावे. नंतर पेमेंट्स ऑप्शनवर क्लिक करून जेवढी रक्कम पाठवायचे आहे ती टाईप इंटर करावे. त्यानंतर तुमचा यूपीआय पिन टाकावा व पेमेंट ची प्रक्रिया पूर्ण करावी.

हेही वाचा : जन धन खात्याशी आधार लिंक नसल्यास होणार १.३० लाख रुपयांचे नुकसान

  • सर्वप्रथम व्हाट्सअप ओपन करून सेटिंगमध्ये जाऊन पेमेंट्सवर क्लिक करावे.
  • नंतर न्यू पेमेंट्स आणि सेंड टू अयूपी आयडी टॅप करावे. त्यानंतर यूपीआय आयडी टाकून व्हेरिफाय करावे.
  • यूपी आयडी व्हेरिफाय झाल्यानंतर अमऊट टाकून इंटर करावे.
  • पेमेंट प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी यूपीआय पिन टाकावा.


ज्यांनी अजूनपर्यंत व्हाट्सअपवर रजिस्टर केले नसेल त्यांना तुम्ही रिक्वेस्ट पाठवू शकता. ती कशी ते पाहू या.

  • व्हाट्सअप चॅट ओपन करून त्यातील अटॅचमेंटवर क्लिक करून पेमेंट या ऑप्शनवर जावे.
  • नेक्स्ट स्क्रीनवर नॉटी फाय वर टॅप करावे व त्यानंतर दुसऱ्या लोकांना व्हाट्सअप पेमेंट फिचरची माहिती द्यावी.

 वरती दिलेल्या पद्धतीच्या माध्यमातून तुम्ही डिजिटल पेमेंट करणे सुरु करु शकतात.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters