आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये आपल्यासाठी काय असणार आपला काय फायदा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी या अर्थसंकल्पात काय वेगळेपण असेल? सर्वसामान्यांना दिलासा देणारा, आर्थिक विकासाला हातभार लावणारे कोणते निर्णय होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा अर्थसंकल्प मांडताना सगळ्यांचा विचार होणे गरजेचे आहे, यामुळे अर्थमंत्र्यांपुढेही काही आव्हाने आहेत. देशांतर्गत महागाई वाढत चालली आहे. रोजगार घटत चाललेला आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात वाढण्याची शक्यता आहे. यामुळे काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रुपया डॉलरच्या तुलनेत घसरताना दिसत आहे. त्यामुळे आयातीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. याखेरीज विदेशी गुंतवणूक, र्निगुंतवणूकीचे धोरण यासारख्या अनेक समस्यांवर त्यांना उपाय शोधायचे आहेत. यामधून मार्ग मार्ग कधक तर येणाऱ्या काळात विकासदर वाढणार आहे. आता काही तासातच अर्थसंकल्प सादर होईल. अर्थमंत्री कोणाकोणाला दिलासा देतात ते थोड्यात वेळात कळणार आहे. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असावा, अशी भावना सर्वसामान्य लोकांची आहे.
कोरोना काळात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शेतीच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक निर्णय घेणे गरजेचे आहे. यामुळे शेतीसाठी या अर्थसंकल्पात काही असेल का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष राहिल. खते, बी-बीयाणे,पीक विमा याबाबत काही घोषणा होईल का ? किसान सन्मान निधीची रक्कम वाढेल का ? शेतकऱ्याचे उत्पन्नवाढीची काही योजना अर्थमंत्री आणतील यावर शेतकऱ्यांचे लक्ष आहे. किसान सन्मान निधीची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. तसेच देशातील पाच राज्याच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.
तसेच उद्योजक उद्योगांसाठी काही सवलती मिळतात का, यावर लक्षठेऊन आहेत. नवे उद्योग उभारणीसाठी सरकार या अर्थसंकल्पातून मदत देईल का याकडे त्यांचे लक्ष आहे. कोविडच्या परिस्थितीमुळे कोसळलेल्या उद्योगांना काही दिलासा मिळेल याकडेही लक्ष आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेकडे रवाना झाल्या आहेत. यामुळे आता काही वेळातच चित्र स्पष्ट होणार आहे. यामुळे सरकारचे पुढील गणित यावर अवलंबून आहे.
Share your comments