Chhatrapati Sambhajinagar News
छत्रपती संभाजीनगरध्ये होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. जरी सरकारने मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेतली तरी आमच्या मराठवाड्याला आणि महाराष्ट्राला काय मिळणार आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उद्या (दि.१६) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर उपस्थित केला आहे. आदित्य ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, दीड वर्ष नुसतं भूल थापा खोटी आश्वासन आणि खोट्या अनाउन्समेंट सरकारने केल्या आहेत. हे खोके सरकार आतापर्यंत काही देऊ शकले नाही. तसंच बैठकीसाठी केलेला सगळा खर्च वाया जाणार आहे. तसंच हा सरकारी खर्च होऊन मी पुन्हा त्यांना विचारतो की मराठवाड्याला काय मिळणार आहे? आणि जरी घोषणा झाली त्याची अंमलबजावणी होणार आहे का?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
मागच्या वेळी अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी पिकाचं नुकसान झालं होतं. पण अजूनही कुठल्याही शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही. हे सरकार पण खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करत आहे, असं ठाकरे म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तसंच राज्यात पावसाने मोठ्या प्रमाणात खंड दिला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देखील जोरदार पावसाची अपेक्षा काम आहे. यामुळे आदित्य ठाकरे दौऱ्यावर आहेत.
ठाकरे छत्रपती संभाजीनगर,पैठण, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. संभाजीनगर तालुक्यातील निपाणी, पैठण तालुक्यातील लोहगांव, गंगापुर तालुक्यातील गुरुधानोरा आणि वैजापूर मतदार संघातील मुद्देशवाडगांव येथिल शेतकऱ्यांसमवेत त्यांनी संवाद साधला आहे.
Share your comments