Mahavikas Aaghadi News : आगामी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आतापासून तयारी सुरु झाली आहे. महाविकास आघाडी जागा वाटपाचं सूत्र कसं असणार याबाबतची माहिती आता समोर आली आहे. लोकसभेसाठी आतापासून नेत्यांच्या बैठका सुरु झाल्या आहेत. अशातच महाविकास आघाडीत असलेला ठाकरे गट मुंबईतील सहापैकी चार जागांवर लढण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीत जागा वाटप नेमकं कसं होत? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा असून त्या सहा जागांसाठी महाविकास आघाडीचा ४-१-१ असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा मुंबईत रंगली आहे. त्यातच लोकसभेच्या जागा उद्धव ठाकरे आढावा घेत असून बैठकही घेतली जात आहे. यातच आता मुंबईतील सहा जागांपैकी चार जागांवर ठाकरे गट लढण्यासाठी इच्छुक असल्याचे समोर आले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र सर्वात मोठं राज्य आहे. यामुळे महाराष्ट्रावर देशातील सर्व नेत्यांची नजर असते. भाजपकडून देखील लोकसभेसाठी ४५ जागा जिंकण्याच्या निश्चय करण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात जोरदार लढत होणार आहे. मात्र महाविकास आघाडीत अद्यापही जागा वाटपाचे सूत्र फिक्स करण्यात आले नाही. त्यामुळे कोणत्या लोकसभेसाठी कोणता पक्ष लढणार? हे पाहणं तितकचं महत्त्वाचं आहे.
उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील तो पक्ष केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज असतो. त्यामुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी समान समान अर्थातच १६-१६-१६ असे जागा वाटप होईल असं वाटत होतं. पण ठाकरे गटाच्या नेत्याने या फॉर्मुला फेटाळला आहे. यामुळे आगामी महाविकास आघाडीचे जागा वाटप नेमकं कसे असणार? हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे.
Share your comments