यंदा च्या खरीप हंगामात पावसामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. अति पावसामुळे आणि पाणी साचून राहिल्यामुळे पीक राणातच खराब होऊन गेली त्यामुळं यंदा च्या खरीप हंगामात उत्पन्न सुद्धा कमी प्रमाणात मिळाले आहे.रब्बी चा हंगाम सुरू झाला. खरीप हंगामानंतर रब्बी पिकाचा हंगाम येत असतो. रब्बी पिकात ज्वारी, गहू, हरभरा इत्यादी पिकाची पेरणी केली जाते.
यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा पिकाखालील क्षेत्र हे सर्वाधिक असेल असा अंदाज वर्षी विभागाने लावला आहे. कारण या रब्बी हंगामात हरभऱ्यास पोषक अस वातावरण आहे शिवाय हंगामाच्या सुरवातीलाच शासनाने कृषी विभागाच्या वतीने शेतकरी वर्गाला बियाणांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.यंदा च्या रब्बी हंगामात हरभऱ्यासाठी पोषक वातावरण तयार झालेलेे आहे त्यामुळं यंदा च्या वर्षी हरभरा पिकाची पेरणी ही सर्वाधिक होणार आहे असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.
हरभरा पिकाला पोषक वातावरण:-
यंदा च्या रब्बी हंगामात हरभरा पीकासाठी पोषक वातावरण आहे.तसेच दरवर्षी पेक्षा या वर्षी सरासरीपेक्षा जास्त च पाऊस झाला आहे त्यामुळे जमिनीतील ओल ही दीर्घकाळ टिकून राहिलेली आहे. यामुळे जर का हरभरा योग्य वेळी आणि योग्य प्रकारे पेरला तर चांगला आणि रोगमुक्त पीक उगवेल. पहिल्यापासून शेतकरी पारंपारिक पध्दतीने हरभऱ्याची पेरणी करत होती. परंतु पेरणीसाठी बीबीएफ पध्दतीचा अवलंब करणे खूप गरजेचे आहे. या पद्धती मध्ये दोन पिकांमध्ये अंतर राहते यामुळे त्याचा उपयोग उत्पन्न वाढीसाठी मोठया प्रमाणात होतो.

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मिळणार बियाणे:-
यंदा च्या रब्बी हंगामात शेतकरी वर्गाचा जास्त जोर हा हरभरा पिकावर राहणार आहे. म्हणून हरभरा च्या बियाणाला प्राधान्य हे दिले जाणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत शेतकऱ्यांना करडई, हरभरा, ज्वारी, जवस या पिकांचे बियाणे शेतकऱ्यांना मिळणार आहे.
बियाणांचा भाव:-
वसंत नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना विविध बियाणे दिली जाणार आहेत. या मध्ये करडई, हरभरा, ज्वारी, जवस या बियाणांचा समावेश असणार आहे. या मध्ये बीडीएनजीके 797 या जातीच्या हरभऱ्याची 10 किलोची पिवशी ची किंमत ही 800 रुपयांना मिळणार आहे.तसेच काबुली बीडीएनजीके 798 ही 10 किलोची बॅग ही 1000 रुपयांना राहणार आहे. तर लातूर 93 या जातीच्या जवस बियाणांची किंमत ही 5 किलो ची बॅग ही 500 रुपयांना मिळणार आहे.
Share your comments