1. बातम्या

व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड, पॅनकार्ड अन् इतर कागदपत्रांचं काय करावं? जाणून घ्या सोप्या भाषेत

व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या आत्माच्या काय होतं, असा प्रश्न नेहमी आपण विचारत असतो. पण काय कधी तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का की, तुमच्या आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा इतर शासकीय कागदपत्रांचं काय होते. शिवाय मृत व्यक्तीच्या या कागदपत्रांचं आणि ओळखपत्राचं काय करावं माहिती नसतं.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
आधार कार्ड, पॅनकार्ड  (Photo - BCCL)

आधार कार्ड, पॅनकार्ड (Photo - BCCL)

व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या आत्माच्या काय होतं, असा प्रश्न नेहमी आपण विचारत असतो. पण काय कधी तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का की, तुमच्या आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा इतर शासकीय कागदपत्रांचं काय होते. शिवाय मृत व्यक्तीच्या या कागदपत्रांचं आणि ओळखपत्राचं काय करावं माहिती नसतं. मृत व्यक्तीच्या अधिकृत कागदपत्रे आणि मृताचे पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट इत्यादी सरकारी ओळखपत्रांबाबत त्यांनी काय करावे याबद्दल कायदेशीर वारसांना माहिती नसते. त्यांनी हे किती काळ ठेवावे? पुढे, ते ही कागदपत्रे संचालित करणार्‍या आणि ती देणार्‍या संस्थांकडे सोपू शकतात? निधन झालेल्या एखाद्याच्या पॅन,आधार, पासपोर्ट इत्यादी विविध सरकारी अधिकृत कागदपत्रांवर कसा व्यवहार करायचा ते येथे जाणून घेऊ.

पॅनकार्ड

हे बँकेच्या कामासाठी आवश्यक असलेले ओळखपत्र आहे. बँक खाती, डिमांट खाती, आयकर रिटर्न, इनकम टॅक्स रिटर्नसाठी आवश्यक असते. मृत व्यक्तीच्या (आयटीआर) आयकर विवरणपत्र भरणे अनिवार्य असते, अशा प्रकारच्या खातीमध्ये जोपर्यंत बंद होत नाहीत तोपर्यंत पॅनचे विवरण भरणेआवश्यक असते. शेख म्हणातात, की जर तुम्ही एकदा का सर्व खाती बंद करण्याची काळजी घेतली तर मृत व्यक्तीचे कायदेशीर असलेले वारस त्या व्यक्तीचे पॅन प्राप्तिकर विभागाकडे सुपूर्द करू शकतात.

पॅन कशाप्रकारे जमा करणार

प्राप्तिकराला पॅन जमा करताना ते योग्यप्रकारे अर्ज करुन देणं आवश्यक आहे. यासाठी मृत व्यक्तीचे कायदेशीर वारस असलेल्या व्यक्तीने ज्या सरकारी अधिकाऱ्याकडे पॅन नोंदणीचा अधिकार असेल अशा मूल्यांकन अधिकाऱ्यांच्या नावाने एक अर्ज लिहिवावा. त्या अर्जात पॅन का जमा करतोय हे नमूद केलं पाहिजे. (उदा. पॅन धारकाचे निधन ) नाव, पॅन आणि जन्म तारीख त्याच्या मृत्यू प्रमाणपत्राची एक प्रतीसह देणं आवश्यक असते. दरम्यान ज्या अधिकाऱ्याकडे आपण पॅन जमा करत आहोत, त्या अधिकाऱ्याची माहिती आयकर विभागाच्या ई-फाइलिंग वेबसाईटवर जाऊन घ्यावी. तथापि, नोंद मृत व्यक्तीच्या पॅन जमा करण्याची पावती घेणे आवश्यक नाही. पण तुम्हाला वाटले की, पुढील काही कामासाठी त्याची गरज भासू शकते तर त्याची पावती घेऊन ठेवा.

Voter ID card मतदार ओळखपत्र

मृत व्यक्तीचे जर मतदान ओळखपत्र असेल तर मतदार नोंदणी नियम 1960 नुसार रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. मृत व्यक्तीचे मतदान कार्ड रद्द करायचे असेल तर मृत व्यक्तीच्या कायदेशीर असलेल्या वारसांना स्थानिक निवडणूक कार्यलायात जावे लागेल. तेथे एक विशिष्ट फॉर्म म्हणजेच मतदार नियमानुसार, अर्ज क्रमांक ७ हा व्यक्तीच्या मृत्यू प्रमाणपत्रासह भरून द्यावा लागेल. कार्ड धारकाचा मृत्यू झाल्याचे कारण देत ते मतदान कार्ड रद्द करावे लागेल.

 

Aadhaar आधार

आधार क्रमांक ओळख पुरावा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून काम करतो. एलपीजी अनुदानाचा लाभ घेताना, सरकारकडून शिष्यवृत्तीचा लाभ घेताना, ईपीएफ खाती असल्यास इत्यादी विविध ठिकाणी आधार क्रमांक उद्धृत करणे किंवा त्याची प्रत देणे बंधनकारक आहे." शभनम शेख , बी कॉम, आणि एल एल. बी पार्टनर खेतान अँण्ड को. म्हणतात की, आधार एक वेगळा ओळख क्रमांक आहे. विशेष म्हणजे निधनानंतरही हा नंबर कायम असतो. कारण आधार क्रमांक हे आपोआप कुठे अपडेट होत नाही. विशेष म्हणजे, युआयडीएआय भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अद्याप मृत्यू नोंदणीशी जोडलेले नाही.

दरम्यान कायदेशीरपणे वारस किंवा कुटुंबातील सदस्यांना मृत व्यक्तीच्या आधार क्रमांकाचा गैरवापर होत नाही हे सुनिश्चित करणे महत्त्वाचे असते. आधार कार्ड निष्क्रिय करणे आणि रद्द करण्याची कोणतीच प्रक्रिया युआयडीएआयकडे सध्या नाही. याशिवाय मृत व्यक्तीच्या निधनाची माहिती आधारच्या डेटाबेसमध्ये अपडेट करण्याची कोणतीच तरतूद असून नाही. दरम्यान, सिक्युरिटी उपाय म्हणून बायोमेट्रिक प्रमाणीकरणाचा गैरवापर रोखण्यासाठी कायदेशीर वारस मृताच्या बायोमेट्रिक्सला लॉक करू शकतात. युआयडीएआयच्या संकेतस्थळावर जाऊन आपण मृताच्या बायोमेट्रिक्सला लॉक करू शकतात.

वाहन चालक परवाना Driving License

मृत व्यक्तीचा वाहन चालक परवाना रद्द आणि जमा करण्याची कोणतीच तरतूद नाही. प्रत्येक राज्य सरकार वाहन चालकाचा परवाना रद्द करणे आणि निलंबित करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे नियम ठरवत असते. दरम्यान चालक वाहन परवाना रद्द करण्यासाठी तुम्ही थेट आरटीओ कार्यालयात जाऊ शकतात. वारस मृताच्या नावे नोंदणीकृत वाहन त्याच्या / तिच्या नावावर हस्तांतरित करण्याच्या राज्य-विशिष्ट प्रक्रियेचीही पुष्टी करू शकतात,

चालक परवानाविषयी अधिकाऱ्यांना सांगितले नाही तर

वाहन चालक परवाना जमा करणे आणि रद्द करण्याचा असा कोणताच कायदा नाही. परंतु त्या कागदपत्रांचा गैरवापर होऊ नये यासाठी आपण ते संबंधित कार्यालयात किंवा अधिकाऱ्याकडे जमा करावे. दरम्यान आजकाल ऑनलाईन घोटाळा करणारे लोक याचा गैरवापर करतात आणि त्याचा भुर्दंड निर्दोष व्यक्तींना भरावा लागतो.

 

पासपोर्ट Passport

पासपोर्टविषयी अशी कोणतीच तरतूद नाही मृत व्यक्तीचे पासपोर्ट रद्द करता येईल किंवा जमा करता येईल. विशेष संबंधित विभागात जाऊन संबंधित अधिकाऱ्याला अर्ज देऊन पासपोर्ट रद्द करण्याचीही तरतूद नाही. पण पासपोर्टची कालमर्यादा संपली तर ते अवैध होत असते. त्यामुळे तथापि, हा कागदजत्र कायम ठेवणे शहाणपणाचे ठरेल कारण आपण नंतर येऊ शकणार्‍या अनावश्यक परिस्थितीत याचा पुरावा म्हणून वापरू शकता. तुमच्या काही कामासाठी पासपोर्ट लागत असेल तर ते वापरू शकतात.

जर आपल्याला कागदपत्रे जमा करायची नसतील तर काय करावे

अशावेळी एकच सल्ला दिला जाईल, तो म्हणजे जर आपल्याला आधार कार्ड, मतदान कार्ड, वाहनचालक परवाना रद्द करायचा असेल तर तुम्ही ते मृत्यू दाखल्या सोबत व्यवस्थित ठेवू शकतात.

English Summary: What to do with Aadhar card, PAN card and other documents after death of a person? Published on: 05 July 2021, 06:26 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters