पुणे
देशभरातील सर्वच राज्यात डोळे येणे ही साथ पसरली आहे. यामुळे नागरिकांची अधिकच धाकधूक वाढली आहे. यामुळे आय फ्लू किंवा डोळ्यांचा संसर्ग म्हणजे काय आणि त्यावर काय उपाययोजना आहेत. तसंच संसर्ग टाळण्यासाठी काय घरगुती उपाय आहेत. हे आपण आज पाहणार आहोत.
डोळे येणे म्हणजे काय?
आजकाल पूर आणि पावसामुळे डोळ्यांचे आजार झपाट्याने पसरत आहेत. डोळ्यांच्या संसर्गामुळे लोकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. डोळ्यांत लालसरपणा, दुखणे, खाज सुटणे आणि सूज येण्याची समस्या येत असेल तर त्यांना हलके घेऊ नका. ही लक्षणे डोळा फ्लूचे सूचक आहेत. डोळ्यांच्या फ्लूला वैद्यकीय भाषेत कंजंक्टिवाइटिस किंवा गुलाबी डोळा असेही म्हणतात.
काय आहेत लक्षणं?
डोळ्याच्या फ्लूच्या समस्येमध्ये संबंधित रुग्णाला दुखणे, डोळ्यावर सूज येणे, डोळे लाल होणे यासारख्या समस्या जाणवतात. डोळ्यातून पाणी वाहू लागते. आजार जसजसा वाढत जाईल तसतसा रुग्णाला पाहण्यास त्रास होऊ लागतो. डोळा चिकट पाणी सोडू लागतो. डोळा दुखण्याची समस्या जाणवते. डोळ्यात खाज येणेही जाणवते, अशी मुख्य लक्षणे रुग्णाला जाणवतात.
उपचार कसे घ्यावेत?
संबंधित रुग्णाला डोळ्याच्या फ्लूची लक्षणे जाणवतात. त्या रुग्णांनी स्वत: औषध घेणे टाळावे. लक्षणे दिसू आल्यास तातडीने डॉक्टरांनी संपर्क साधून त्यांच्या सल्लानुसारच औषधोपचार घ्यावा. डॉक्टर रुग्णाची स्थिती आणि लक्षणांवर आधारित औषधे वापरण्याची शिफारस करतात. तसंच रुग्णांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
Share your comments