1. बातम्या

शोभिवंत मत्स्यालयात प्रामुख्याने कोणते मासे ठेवले जातात?

शोभिवंत मासे लोकांना स्वयंरोजगार निर्माण करून देतात . खर्च कमी व भरपूर उत्पन्न मिळते त्यामुळे ह्या क्षेत्राकडे लोकांचा खूप कल वाढत आहे. मासे खूप शांत प्रजाती आहेत.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Fish news update

Fish news update

जयंता टिपले

शोभिवंत मत्स्यालय हे आजकाल खूप लोकप्रिय झालेले आहे. खूप लोक याकडे एक छंद म्हणून पाहत आहेत. शोभिवंत मत्स्यालय घरात ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस याची मागणी वाढत आहे. वास्तूशास्त्रानुसारही शोभिवंत मत्स्यायालयाला लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे लोक शोभिवंत मत्स्यालय सार्वजनिक ठिकाणी, दवाखान्यात, घरात, महाविद्यालयात, कामाच्या ठिकाणी ठेवत आहेत. त्यामुळे आपल्याला त्याच्याकडे व्यावसायिकदृष्ट्या बगता येते.

शोभिवंत मासे लोकांना स्वयंरोजगार निर्माण करून देतात . खर्च कमी व भरपूर उत्पन्न मिळते त्यामुळे ह्या क्षेत्राकडे लोकांचा खूप कल वाढत आहे. मासे खूप शांत प्रजाती आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांच्यामुळे कुठलाही त्रास नाही. त्यासाठी शोभिवंत मत्स्यालयात प्रामुख्याने ठेवले जाणारे मासे दोन

विभागात खालील प्रमाणे आहे :
लाईव्ह बेअरर्स किंवा पिल्लांना जन्म देणारे मासे – यामध्ये गप्पी, मॉली, प्लॅटी, स्वोर्ड टेल्स हे मासे प्रामुख्याने मोडले जातात. हे मासे पाळायला व त्याचे प्रजनन करायला अत्यंत सोपे असते. यांच्या काही विशेष गरजा नसल्याने हे पाळणे अजिबात कठिण नसते. शक्यतो प्रजनन करते वेळी एका नरास दोन माद्या ह्या प्रमाणात ठेवावे. ह्यांचे खालचे ओठ किंचीत जाडसर असतात, झाडांच्या पानावर जमलेलं शेवाळ खायला ओठांचा उपयोग करतात. ह्यामुळेच कदाचित ह्यांना बाकीच्या माश्यांना टोचायची आवड असते.

आकाराने मोठ्या माशांना ह्यांचा त्रास होत नाही उलट झुपकेदार शेपटीमुळे गप्पीसारख्या माश्यांनाच इतरांपासून सांभाळायला लागते. लाईव्ह बेअरर्समध्ये नर मादी ओळखण्याची सहज सोपी खूण म्हणजे गुदद्वाराजवळचा पर. मादीमध्ये हा त्रिकोणी असून नरामध्ये तो जननेंद्रीयाचे काम करतो आणि आडव्या नळीसारखा व लांबट असतो. नर हे मादीपेक्षा आकाराने लहान असतात.

गप्पी-
गप्पीला शोभिवंत मत्स्यालयात फुलपाखरु म्हंटले जाते ते त्यांच्या चित्तवेधक रंगांमुळे आणि लहरणार्‍या शेपटीमूळे. कल्पनेपलिकडल्या रंगात उपलब्द्ध असलेले गप्पी कुणाच्याही नजरेला सहज आकर्षून घेतात. मादी त्यामानाने कमी रंगीत असतात. रंग आणि शेपटीच्या आकारावरु ह्यात कित्येक जाती आहेत. पिल्ले वाढवून विकताना नर व मादी वेगळ्या टाक्यात ठेवतात. त्यामुळे नराच्या शेपटीची वाढ चांगली व लवकर होते.

मॉली -
मॉलीचे काळे, पांढरे, सोनेरी, चंदेरी एकसमान रंग त्यांना पॉप्युलर बनवतातच पण त्यापेक्षाही चांगली गोष्ट म्हणजे त्यांची कुणाशीही न भांडण्याची वृत्ती. त्यामुळे टॅन्कमध्ये फक्त मॉलीजच असल्यास (नर व मादी) त्यांची संख्या वाढणारच. ह्यात पंखा वरुन सेल फिन, मून टेल, लायरा टेल असे प्रकार असतात.

प्लॅटी,स्वोर्डटेल -
प्लॅटी आणि स्वोर्डटेल लाल रंग हा ह्यांचा बेस असला तरी हे बर्र्याच रंगात मिळतात. प्लॅटीला स्वोर्ड (तलवार) नसते. स्वोर्डटेच्या शेपटीच्या खालच्या टोकाला तलवारीसारखे लांब टोक असते. प्लॅटि व स्वोर्डटेल्सच्या प्रजाती रंग आणि पंखामधील फरकांमुळे ओळखता येतात.

गोल्डफिश -
गोल्डफिश अ‍ॅक्वेरीयम मधला सर्वात जास्त फेमस मासा म्हणजे गोल्डफिश. काळाकभिन्न ब्लॅक मूर, रंगीबेरंगी शिंतोडे उडवलेला शुबंकीन, बाहेर आलेल्या डोळ्यांचे टेलिस्कोपीक आय, लांबसडक कॉमेट, गुळगुळीत (खवलेरहीत भासणार्‍या) शरीराचे कॅलीको, एखाद्या चेंडूसारखे गरगरीत पर्ल स्केल, बबलगमच्या फुग्यांसारखे फुगे डोळ्यावर असलेले बबलआय, पांढरेधोप शरीर आणि लाल टोपी असलेले रेड कॅप, सिंहाच्या आयाळीसारखे खवले असलेल्या डोक्याचे लायनहेड या प्रजाती गोल्डफिशमध्ये.

अ‍ॅनाबॅन्टीड्स -
लॅबॅरिन्थ ग्रुपच्या माश्यांचं वैशिष्ट्य असं की ह्यांना हवेतला ऑक्सिजन घेता येतो. फायटर व गुरामी फिश ही ह्या प्रकारच्या माशांची नावं. हे ही पाळायला आणि प्रजननाला अत्यंत सोपे असतात. पाण्याच्या पृष्ठभागावर पानाच्या आधाराने तोंडातून बुडबुडे काढून बनवलेलं ह्यांच घरटं आणि त्यानंतर नर घेत असलेली पिल्लांची काळजी घेत असतात.

फायटर -
फायटर हा मासा हवेतील प्राणवायू घेऊ शकतो. एक नर दुसर्‍या नराला आपल्या जवळ येऊ देत नाही. एका टाकी मध्ये एकच मासा ठेवतात. तेजस्वी रंग आणि झुबकेदार शेपटी व इतर पर ह्यामुळे हा अतिशय देखणा दिसतो. लाल, निळा, हिरवट, सोनेरी, पांढरा, काळा व ह्यांचे मिश्रित अश्या विविध रंगामध्ये मिळते. नर हे मादीपेक्षा जास्त रंगीत व जास्त मोठे पर असणारे असतात आणि सहज ओळखता येतात.

गुरामी -
गुरामी हा पाळायला अगदी सोपा असतो. पिवळसर सोनेरी रंगाच्या शरीरावर पाढरट ठिपके, लॅटरल लाईनवर काळ्या ठिपक्यांची नक्षी, पाण्यात सहज विहरणे हे अतिशय सुंदर तर दिसते. नर मादी ओळखण्याची आणखीन एक सोपी खूण म्हणजे नराचा वरचा पर मादीपेक्षा लांब असतो. गोल्डन गुरामी, किसिंग गुरामी व हनी गुरामी या गुरामीच्या प्रजाती आहेत.

टेट्रा -
टेट्रा अत्यंत शांत असे हे मासे हे झाडांनी गच्च भरलेल्या टॅन्कमध्ये अतिशय खूलून दिसतात. शोबत-शोबत राहाण्याची आवड असल्याने हे शक्यतो डझनाच्या संख्येने पाळावेत. सगळ्या माश्यांत मिळून मिसळुन राहतात. पण छोट्या आकारामूळे ह्यांना जास्त मोठ्या माश्यांबरोबर ठेवू नये. यात हिरवी, गुलाबी, पिवळी व जांबळी या रंगाच्या प्रजाती असतात.

चिकलेटस् -
चिकलेटस् आकाराने चपटे, आकारानुसार थोडेसे अ‍ॅग्रेसिव्ह, टॅन्कमध्ये लपण्याच्या जागा, गुहा असणे आवश्यक असते. हे रोग चटकन पकडतात पण रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे रोगाशी झगडतातही. ह्या ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे हे पिल्लांची काळजी घेतात.

एजेंल-
एजेंल हा मासा दिसतोही सुंदर आणि वागतोही सुंदर. या मासा ला राणी मासा सुद्धा म्हणनतात आणि दिसायला पतंगी सारखा दिसतो. तीन काळे पट्टे असलेले मार्बल एजेंल, पट्टे नसलेले स्वच्छ सोनेरी गोल्डन एजेंल, अंगावर चट्टे असलेले स्कार एजेंल, लाल डोळे असलेले रेड आय एजेंल, वेल टेल, घोस्ट, ब्लॅक अश्या प्रजाती आहेत.

शार्कस् -
शार्कस् फुटभरापेक्षा जास्त वाढणार्‍या टायगर शार्क पासून ते सुंदर रंगसंगती असणार्‍या रेड टेल शार्क सारख्या प्रजाती आहेत. याला गोड्यापाण्यातील शार्क सुद्धा म्हणनतात. यात कॉमन सकरफिश (प्लेको), कॅटफिश, लोच, ईल यासारखे मासे येतात. तळाशी चरणारे हे मासे टॅन्कच्या साफसफाईत महत्वाची भूमिका बजावतात. दगड, झाडं, काच यावर जमलेले शेवाळ खाणं हा यांचा आवडीचा उद्योग.

फ्लॉवर हॉर्न -
फ्लॉवर हॉर्न आणि पॅरटफिश अंगावर फुलांची नक्षी आणि डोक्यावर टेंगूळ असलेला हे मासे. अतिशय सुंदर असे दिसतात.

लेखक - जयंता टिपले, सहाय्यक प्राध्यापक (अतिथी व्याख्याता), जलीय प्राणी आरोग्य व्यवस्थापन विभाग, मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर. महाराष्ट्र. मो. नं. ८७९३४७२९९४.

English Summary: What fish are mainly kept in ornamental aquariums Published on: 22 September 2023, 01:02 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters