पंतप्रधान किसान सन्मान योजना अंतर्गत जे घोटाळेबाज लोक आहेत त्यांना यामध्ये आता लाभ होणार नाही जे की नियमात आता बदल झाले असल्याने जे घोटाळेबाज लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यात रुपये ही जमा होणार नाही. घोटाळेबाज लाभार्थी आहेत त्यांच्यावर कुठतरी आळा बसावा म्हणून केंद्र सरकारने आता या योजनेमध्ये मोठे बदल केले आहेत. आता जे या नियमात बसतील त्यांनाच किसान सन्मान योजनेचा लाभ भेटणार आहे तर घोटाळेबाज लोकांना लाभ भेटणार नाही. आता शेतकऱ्याना नियमाच्या बदलानुसार रेशनकार्ड मध्ये पूर्तता करणे अनिवार्य आहे नाहीतर जो वार्षिक हप्ता मिळत होता तो भेटणार नाही.
रेशन कार्ड क्रमांक अनिवार्य :-
आता पंतप्रधान किसान सन्मान योजनेत जर शेतकऱ्याला नवीन नोंद करायची असेल तर रेशनकार्ड वरील क्रमांक देणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही एकदा की रेशन कार्ड क्रमांक दिला तर त्याच सदस्याला पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेता येणार आहे. जरी लाभार्थ्याने रेशनकार्ड क्रमांक दिला नाही तर त्यास पुढील हप्ता मिळणार नाही.
मुळ सत्यप्रत सादर करण्याची अट रद्द :-
एवढ्या दिवस पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू आहे मात्र जे अपात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्यावर कुठेतरी आळा घालण्यासाठी आता रेशनकार्ड क्रमांक अनिवार्य केला आहे. क्रमांकाबरोबरच आता रेशनकार्ड ची पीडीएफही सुद्धा अपलोड करावी लागणार आहे. कागदपत्रांची जी प्रत होती ती रद्द करण्यात आले आहे. जसे की पहिले या योजनेला जी कागदपत्रे जशी की आधार कार्ड, बँक पासबुक, जाहीरनामा ची प्रत दाखल करावी लागत होती ती आता रद्द करण्यात आली आहे. आता या कागदपत्रांच्या फाईल्स पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहेत त्यामुळे जे अपात्र लाभार्थी आहेत त्यांच्यावर आळा बसणार आहे.
यापूर्वी सुद्धा पंतप्रधान किसान सन्मान योजनांमध्ये बदल झाले होते. जसे की याआधी शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबरद्वारे योजनेची स्थिती तपासण्यात आली होती. मात्र आतापर्यंत जे या योजनेसाठी जे अपात्र लाभार्थी होते या योजनेचा लाभ घेत होते त्यांच्यावर आळा घालण्यासाठी नियमात बदल केला आहे. शेतकऱ्याना आता किसान पोर्टलवर बँक खाते क्रमांक व आधार क्रमांक देऊनच सद्याची स्थिती बघावी लागणार आहे.
Share your comments