वातावरणामध्ये थोडा जरी चढ उतार झाला तरी शेतकऱ्यांची कसरत सुरू होते. मागील दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची जीव वर खाली झाला होता. साध्य थंडी असल्याने तापमानात घट झाली त्यामुळे द्राक्षाच्या फळाला तडे जायला लागले आहेत. द्राक्षांना हवे तसे तापमान पाहिजे तसेच त्यांना तडे जाऊ नयेत म्हणून बागेत शेकोट्या पेटवायला सुरू केले आहे. द्राक्षेची लागवडीपासून ते काढणीपर्यंत चांगल्या प्रकारे जोपासना केली तरच शेतकऱ्यांच्या पदरात हे पीक पडते त्यामुळे आता शेतकरी एवढ्या थंडीमध्ये बागेत जाऊन द्राक्षांना ऊब देण्याचे काम करत आहेत.
निफाडच्या गहू संशोधन केंद्रात ६ अंश सेल्सिअस ची नोंद :-
मागील चार पाच दिवसापासून वातावरणात ढगाळपणा आलेला आहे तर अवकाळी पाऊस पडत असल्याने वातावरणातील थंडी कमी आलेली आहे परंतु उत्तरेकडून वारा वाहत असल्यामुळे पुन्हा वातावरणात गारठा तयार झालेला आहे. वातावरणामध्ये अचानक थंडता निर्माण झाल्यामुळे पूर्ण निफाड तालुका गारठून गेलेला आहे. थंडीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तेथील नागरिक शेकोट्या करत आहेत तर याचा परिणाम पिकांवर होत आहे. द्राक्षच्या बागेचे रक्षण करण्यासाठी स्वतः शेतकरी बागेत जाऊन शेकोट्या पेटवून द्राक्षांना ऊब देत आहेत.
रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण :-
द्राक्षांच्या बागेवर जरी गुलाबी थंडीचा परिणाम होत आहे मात्र दुसऱ्या बाजूस रब्बी हंगामातील पिकांना ही थंडी पोषक ठरत आहे. पोषक वातावरण निर्माण झाले असल्याने गहू, हरभरा तसेच ज्वारीच्या पिकाची जोरात वाढ होत आहे. थंडीच्या वातावरणात कांदा, पिकावर करपा तसेच मर रोगाचा आजिबात प्रादुर्भाव होत नाही. एका बाजूला थंडीमुळे द्राक्षांच्या बागेचे नुकसान तर दुसऱ्या बाजूस रब्बीतील पिकांची जोरदार वाढ.
काय आहे शेतकऱ्यांचे म्हणने?
निफाड मध्ये जोरात थंडी पडली असल्याने तेथील लोक यर गारठून गेले आहेत तर तेथील शेतकऱ्यांवर कधी आस्मानी संकट तर कधी वातावरणाचा अनियमितपणा चा सामना करावा लागतो. वाढत्या थंडीमुळे द्राक्षांना तडे जाण्याची भीती असते. द्राक्षाचे सरंक्षण करायचे असेल ठिबकद्वारे पाणी तर बागेत शेकोटी असायची त्यामुळे ऊब निर्माण होऊन द्राक्षांना तडे जाण्याचे थांबेल असे द्राक्षे उत्पादक बागायतदार चंद्रभान जाधव सांगतात
Share your comments