1. बातम्या

काय सांगता! आता बटाट्यापासून तयार होणार प्लास्टिक; वाचा काय आहे हा माजरा

गुजरात सरकार बटाट्यांमधून प्लास्टिक बनवण्याच्या तयारीत आहे. मित्रांनो आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, पाटणच्या हेमचंद्राचार्य उत्तर गुजरात विद्यापीठाच्या जीवन विज्ञान विभागाचे प्रोफेसर डॉ. आशिष पटेल यांनी केलेल्या एका अभ्यासात बटाट्याच्या स्टार्चपासून बायो-प्लास्टिक बनवता येते, हे उघडपणे समोर आले आहे. या बायो प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल असा दावा केला जात आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
potato

potato

गुजरात सरकार बटाट्यांमधून प्लास्टिक बनवण्याच्या तयारीत आहे. मित्रांनो आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, पाटणच्या हेमचंद्राचार्य उत्तर गुजरात विद्यापीठाच्या जीवन विज्ञान विभागाचे प्रोफेसर डॉ. आशिष पटेल यांनी केलेल्या एका अभ्यासात बटाट्याच्या स्टार्चपासून बायो-प्लास्टिक बनवता येते, हे उघडपणे समोर आले आहे. या बायो प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल असा दावा केला जात आहे.

प्लास्टिकमुळे प्राण्यांचा मृत्यू होतं आहे जे की बायोप्लास्टिक मुळे होणार नाही. निश्चितचं यामुळे सजीवांवर सकारात्मक परिणाम होणार आहे. सध्या वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकऐवजी बायोप्लास्टिक्सचा वापर केल्यास निसर्गाला याचा फायदा होईल. बायो-प्लास्टिक वापरल्याचा फायदा असा की या प्लास्टिकचे काही दिवसांतच विघटन होतं असते. या अभ्यासात याबाबत खुलासा देखील झाला आहे. यामुळेचं या प्रकल्पासाठी गुजरात राज्य जैवतंत्रज्ञान मिशनने 47 लाख रुपयांचे अनुदान दिले आहे.

महत्वाच्या बातम्या:

Farming Business Idea : 'या' झाडाची लागवड करा आणि मिळवा हमखास उत्पन्न; वाचा याविषयी सविस्तर

Banana Farming : पुण्याची केळी निघाली मलेशिया वारीला!! पुण्यातील शेतकऱ्याचा प्रयोग ठरला यशस्वी

ऐकलं का बटाट्यापासून मात्र 10 दिवसांत तयार होईल प्लास्टिक

संशोधकांचे म्हणणे आहे की, बटाट्याच्या स्टार्च पासून बायोप्लास्टिक बनवता येईल. हेमचंद्राचार्य यांनी गुजरातमधील पाटण येथे असलेल्या उत्तर गुजरात विद्यापीठाच्या जीवन विज्ञान विभागाच्या कॅम्पसमध्ये हा प्रकल्प बनवण्यास सुरुवात केली आहे. अवघ्या 10 दिवसांत बटाट्यापासून बायो प्लास्टिक बनवता येणे शक्य होणार आहे. ते म्हणाले की, बायोप्लास्टिकचे अनेक फायदे होतील. एक म्हणजे ते सध्याच्या प्लास्टिकपेक्षा अधिक शुद्ध असेल. दुसरे म्हणजे, ते निसर्गता आणि लवकर नष्ट होऊ शकते.

काय आहे बायो-प्लास्टिक 

जैव-प्लास्टिक अर्थात बायो प्लास्टिक म्हणजे कॉर्न, गहू किंवा उसाच्या झाडांपासून बनवलेले प्लास्टिक किंवा पेट्रोलियम ऐवजी इतर सेंद्रिय पदार्थांपासून बनवलेले प्लास्टिक म्हणजे बायो-प्लास्टिक होय. हे बायोडिग्रेडेबल आणि कंपोस्टेबल प्लास्टिकचे पदार्थ आहेत.

मका आणि उसाच्या झाडांमधून साखर काढून तिचे पॉलिलेक्टिक ऍसिड (पीएलए) मध्ये रूपांतर करून बायो प्लास्टिक मिळवता येते. हे सूक्ष्मजीवांच्या पॉलीहायड्रॉक्सीयाल्कानोएट्स (PHA) पासून देखील बनविले जाऊ शकते. पीएलए प्लॅस्टिकचा सर्वाधिक वापर अन्न पॅकेजिंगमध्ये केला जातो, तर पीएचए पासून निर्मित बायो प्लास्टिकचा वापर जास्त करून वैद्यकीय उपकरणांमध्ये जसे की सिवने आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी पॅचेस (हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी शस्त्रक्रिया) मध्ये केला जातो.

बायो-प्लास्टिक्स सिंगल-युज प्लास्टिकपेक्षा चांगले कसे आहेत?

जैव-प्लास्टिक किंवा वनस्पती-आधारित प्लास्टिकचा पेट्रोलियम-आधारित प्लास्टिकला पर्याय म्हणुन हवामानास अनुकूल असल्याचे सांगितले जाते. प्लास्टिक हे सहसा पेट्रोलियमपासून बनवले जाते. त्यांचा जीवाश्म इंधन कमी होणे आणि हवामान बदल यासारख्या समस्यांवर परिणाम होतो. असा अंदाज आहे की 2050 पर्यंत जागतिक CO2 उत्सर्जनाच्या 15% साठी प्लास्टिक जबाबदार असेल.  पेट्रोलियम-आधारित प्लास्टिकमधील कार्बनचा काही भाग ग्लोबल वॉर्मिंगमध्ये योगदान देतो. दुसरीकडे, जैव-प्लास्टिक हे हवामानास अनुकूल आहेत, म्हणजेच जैव-प्लास्टिक कार्बन उत्सर्जनाला हातभार लावत नाहीत, असे मानले जाते.

जैव-प्लास्टिकचे हे होतील विपरीत परिणाम

जंगलतोड: मोठ्या प्रमाणात जैव-प्लास्टिकचे उत्पादन जागतिक स्तरावर जमिनीचा वापर बदलू शकते. याद्वारे वनक्षेत्रातील जमिनीचे शेतीयोग्य जमिनीत रूपांतर होऊ शकते. मका किंवा उसापेक्षा जंगले जास्त कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. यामुळे याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

अन्नाचा तुटवडा: अन्नाऐवजी प्लास्टिकच्या उत्पादनासाठी कॉर्नसारख्या अन्नधान्यांचा वापर केल्यास अन्नधान्याची कमतरता निर्माण होऊ शकते.

औद्योगिक कंपोस्टची आवश्यकता: बायोप्लास्टिक तोडण्यासाठी ते उच्च तापमानाला गरम करणे आवश्यक आहे. तीव्र उष्णतेशिवाय, जैव-प्लास्टिक जमिनीवर भराव किंवा कंपोस्ट खराब करू शकणार नाहीत, जर ते सागरी वातावरणात सोडले तर ते पेट्रोलियम-आधारित प्लास्टिकसारखे हानिकारक असेल.

English Summary: What do you say Now the plastic will be made from potatoes; Read this article Published on: 04 May 2022, 10:30 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters