हापूस आंबा म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते कोकणचे. हापूस आंब्याला कोकणची शान म्हणून ओळखले जाते. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा उत्पादक शेतकरी हतबल झाले होते मात्र हापूस आंब्याचा तोरा अजूनही कायमच आहे.
मुंबई एपीएमसी मध्ये मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याच्या नावाखाली बोगस हापूस आंब्याची विक्री केली जात होती. यामुळे भौगोलिक नामांकन असलेल्या कोकणचा हापूस आंब्याला मोठा फटका बसत होता. ज्या पद्धतीने हापूस आंबा कोकणची शान वाढवत आहे अगदी त्याच पद्धतीने आता जुन्नरचा हापूस आंबा जुन्नर चे वैभव द्विगुणित करणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, जुन्नरच्या शिवनेरी हापूस आंब्याला जीआय टॅग अर्थात भौगोलिक नामांकन देण्यासाठी हालचाली जोरात सुरू झाल्या आहेत. यासाठी मायबाप शासनाकडून विशेष सहकार्य केले जात असल्याचे सांगितले जात आहे.
निश्चितच भौगोलिक नामांकन मिळाल्यानंतर जुन्नरचा शिवनेरी हापूस आंबा मोठ्या प्रमाणात परदेशवारी करू शकणार आहे. याशिवाय जुन्नरच्या हापूस आंब्याला अधिक दर देखील मिळेल. हे जरी सत्य असले तरी देखील जुन्नरचा हापूस आंबा भौगोलिक नामांकन मिळवण्यासाठी त्या दर्जाचा असणे आवश्यक आहे. जुन्नरच्या हापूस आंब्याला भौगोलिक नामांकन देण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली गेली असल्याचे सांगितले जात आहे.
जुन्नर मध्ये उत्पादित केला जाणारा शिवनेरी हापूस आंबा चवीला अतिशय गोड रसाळ आणि मधुर आहे. एवढेच नव्हे या आंब्याला खूप मोठी ऐतिहासिक धरोहर देखील लाभलेली आहे. असे सांगितले जाते की शिवकाळात या आंब्याचा गुणगौरव केला गेला आहे. या संबंधित अनेक शिवकालीन ग्रंथात माहिती देखील आढळते. मात्र असे असले तरी जुन्नर मधील आंबा बागायतदारांना हापूस आंबा निर्यातीसाठी योग्य व्हावा या हेतूने काही काळजी घ्यावी लागणार आहे.
एकंदरीत आंबा बागायतदारांना निर्यातीसाठी आवश्यक बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. जुन्नरच्या शिवनेरी हापूस आंब्याला असलेला ऐतिहासिक धरोहर लक्षात घेता येथील शेतकऱ्यांनी शिवनेरी हापूस आंब्याला भौगोलिक नामांकन देण्यासाठी वेळोवेळी मागणी उचलून धरली होती आणि आता अखेर शासनाने शेतकर्यांच्या या मागणीची दखल घेतली असून या आंब्याला भौगोलिक नामांकन देण्यासाठी आता हालचाली जोरावर सुरू आहेत.
जुन्नरच्या शिवनेरी हापूस आंब्याला भौगोलिक नामांकन मिळाल्यास येथील आंबा बागायतदारांना याचा मोठा फायदा होणार आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की भौगोलिक नामांकन असलेल्या शेतमालाला जागतिक बाजारपेठेत एक वेगळे स्थान दिले जाते तसेच याला मोठी मागणी असते आणि भौगोलिक नामांकन असलेले शेतमाल अधिक दराने विक्री होत असते. या बाबींचा विचार करता जर जुन्नर मधील शिवनेरी हापूस आंब्याला भौगोलिक नामांकन दिले केले तर निश्चितच जुन्नरचा आंबा बागायतदारांना याचा भला मोठा फायदा होणार आहे.
Share your comments