पुणे : कोरोना तिसऱ्या लाटेने सगळी कडे थैमान घालायला सुरुवात केली. ग्रामीण भागात पण कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. पण आता मात्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाने कोरोना कोरोनाला हद्दपार केले आहे. पुणे जिल्ह्यात तिसऱ्या लाटेने डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील अनेक गावांनी कोरोनाला वेशीबाहेर ठेवण्यात यश मिळविले आहे.
१४ तालुक्यांतील कोरोनाला वेशीबाहेर ठेवले, तर जवळपास १ हजार १४८ गावांनी विषाणूला हद्दपार केले आहे. जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात आलेले सर्वेक्षण मोहीम , तसेच लसीकरण मोहिमेमुळे हे शक्य झाले आहे. तिसऱ्या लाटेतही कोरोनामुक्त राहिलेल्या गावांत प्रशासनातर्फे ५० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ग्रामीण भागात मार्च २०२० ला पहिला रुग्ण हेवली तालुक्यात सापडला. यानंतर कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. ग्रामीण भागातही झपाट्याने वाढला. जवळपास संपूर्ण जिल्ह्यात रुग्ण वाढले.
तालुकानिहाय कोरोनाला हद्दपार करणाऱ्या गावांची संख्या
भोर १३९
खेड १३२
मावळ १२७
इंदापूर १२०
वेल्हा १२०
जुन्नर ११४
मुळशी ११०
हवेली ८९
शिरूर ७७
बारामती ७१
दौड ४९
दुर्गम भागातील गावातही कोरोनाबाधित आढळले. ही लाट थोपविण्यासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. हरघर दस्तक मोहिमेअंतर्गत प्रत्येक गावातील घराघरांत जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात आली. आजारी नागरिकांची जागेवरच अँटिजन चाचणी करण्यात आली, तर काहींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. या मोहिमेमुळे अनेक रुग्णांना तातडीने उपचार देणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला शक्य झाले. या सोबतच लसीकरणाची मोहिमही वेगाने करण्यात राबविण्यात आली.
घरोघर लसीकरण
सुरुवातीला लसीकरणाचा तुडवडा ग्रामीण भागात होता. मात्र, असे असतांनाही फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य कर्मचारी आणि वृद्ध नागरिकांचे लसीकरण वेगाने आले. गावपातळीवरही नागरिकांनी एकत्र येत राबविलेल्या उपाय योजनांमुळे काही गावे ही कोरोनामुक्त राहिली. जिल्ह्यातील ३६ गावांनी कोरोनाला वेशीबाहेर ठेवले, तर १ हजार १४८ गावांनी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेला कोरोना विषाणूला गावातून हद्दपार करीत वेशीबाहेर काढले.
धडक सर्वेक्षण, हरघर दस्तक, लसीकरण मोहीम ग्रामीण भागात जेव्हा रुग्ण आढळले तेव्हा जिल्हा परिषदेतर्फे गावागावांत आरोग्य, तपासणी करण्यात आली. यात आशासेविका, आरोग्यसेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी केलेल्या या सर्वेक्षणामुळे बाधित रुग्ण सापडले आणि त्यांना उपचार देता आले.
Share your comments